श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा जयंतीनिमित्त रक्तदान

By Admin | Updated: July 3, 2017 01:57 IST2017-07-03T01:57:01+5:302017-07-03T01:57:01+5:30

अकोला : ‘लोकमत’चे संस्थापक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिरात रविवारी नागरिकांसह कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदान केले.

Blood donation for the revered Jawaharlalji Darda Jayanti | श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा जयंतीनिमित्त रक्तदान

श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा जयंतीनिमित्त रक्तदान

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : ‘लोकमत’चे संस्थापक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिरात रविवारी नागरिकांसह कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदान केले. लोकमत व डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या संयुक्त विद्यमाने शिबिर पार पडले. सोबतच स्नेह नगर (गीता नगर) कार्यालय परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील लोकमत कार्यालयात सकाळी १० वाजता श्रद्धेय बाबूजींच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करून रक्तदान शिबिराची सुरुवात झाली. यावेळी ‘लोकमत’चे निवासी संपादक रवी टाले, सहायक महाव्यवस्थापक रमेश डेडवाल यांच्यासह डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे राम देशपांडे उपस्थित होते. दिवसभर चाललेल्या शिबिरात लोकमत परिवारातील सदस्यांसह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले. मानवी जीवनासाठी रक्ताच्या महत्त्वासोबतच पर्यावरणाचेही महत्त्व जाणून नवीन कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी लोकमत परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Blood donation for the revered Jawaharlalji Darda Jayanti