शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘लॉकडाऊन’च्या काळात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भागविली रक्ताची उणिव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 17:26 IST

रक्ताचा तुटवडा जाणवणार होता; मात्र ही उणिव प्रशासनातील अधिकारी, कर्मचाºयांनी रक्तदान करून भरून काढली.

लोकमत न्यूज नेटवर्ककोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी २५ मार्चपासून संपूर्ण जिल्हा ३ मे पर्यंत ‘लॉकडाऊन’ करण्यात आला. यासह संचारबंदी लागू झाल्याने गर्दी टाळण्यास्तव ३९ दिवस खासगीत होणारी रक्तदान शिबिरे रद्द करण्यात आली. यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवणार होता; मात्र ही उणिव प्रशासनातील अधिकारी, कर्मचाºयांनी रक्तदान करून भरून काढली. तथापि, उपलब्ध रक्तसाठा ३० एप्रिलपर्यंत पुरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.अपघातग्रस्त रुग्ण आणि गर्भवती महिलांना प्रामुख्याने रक्ताची गरज भासते; मात्र संचारबंदी व ‘लॉकडाऊन’च्या काळात रक्तदान शिबिरे आयोजित केल्यास नियमाचा भंग होऊन परिस्थिती बिघडू शकते, ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने जिल्हास्तरावरील प्रशासकीय कार्यालयांमध्ये रक्तदान शिबिरे आयोजित करून अधिकारी, कर्मचाºयांना रक्तदान करायला लावावे, असा निर्णय घेतला. त्याची २६ मार्चपासून ३० मार्चपर्यंत अंमलबजावणी करण्यात आली. त्यात जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पोलिस अधीक्षक कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालयासह सहाही तहसील कार्यालयांमधील अधिकारी, कर्मचाºयांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. यामाध्यमातून विविध रक्त गटाच्या २१२ रक्त पिशव्या गोळा झाल्या. एवढे रक्त एप्रिल महिन्याअखेर पुरणार असल्याने काही शिबिरे त्यावेळी रद्द करून २५ एप्रिलनंतर घेण्याचे ठरविण्यात आले. तथापि, अधिकारी आणि कर्मचाºयांच्या पुढाकारामुळे ‘लॉकडाऊन’च्या काळातही रक्ताची उणिव भासली नसल्याने या उपक्रमाप्रती नागरिकांमधून शासनाचे कौतुक होत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभुमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात गत काही दिवसांपासून शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे ब्लड बँकेत रक्त साठा उपलब्ध आहे; असे असले तरी ‘निगेटिव्ह’ रक्त गटाची उणिव भासत आहे. त्यामुळे पुन्हा एकवेळ प्रशासकीय पातळीवर रक्तदान शिबिरांचे नियोजन करण्याची बाब विचाराधिन आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी दिली.

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीwashimवाशिम