केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ रक्तदान शिबीर
By सचिन राऊत | Updated: March 29, 2024 17:01 IST2024-03-29T17:01:11+5:302024-03-29T17:01:55+5:30
देशातील सत्तेच्या विरोधात असलेल्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना बेकायदेशीर अटक करून दडपशाही केली जात असल्याचा आरोप आपने केला आहे.

केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ रक्तदान शिबीर
अकोला : आम आदमी पार्टीचे संस्थापक व राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. त्या निषेधार्थ चांदेकर चौकात जिल्हा संयोजक कैलास प्राणजाळे व महानगर संयोजक हाजी मसूद अहमद यांच्या नेतृत्वात रक्तदान शिबीर घेऊन निषेध व्यक्त केला. ईडी या स्वायत्त संस्थेचा भाजपच्यावतीने वापर होत आहे असा आरोप या आंदोलनाच्या वेळी करण्यात आला.
देशातील सत्तेच्या विरोधात असलेल्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना बेकायदेशीर अटक करून दडपशाही केली जात असल्याचा आरोप आपने केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या ऊपस्थितीमध्ये चांदेकर चौकात रक्तदान शिबीर घेऊन आंदोलन करण्यात आले.
यावेळी आम आदमी पार्टी जिल्हा संयोजक कैलास प्रांणजळे, महानगर संयोजक हाजी मसूद अहमद, अरविंद कांबळे, काजी लायक अली, ज्ञानेश्वर साखरकर, प्रमोद मेश्राम, विक्की चोरपगार, रफिक भाई, गोपनारायण, अभिषेक पांडे, किशोर प्राणजाळे, गजानन बुडूकले, सागर प्रांणजळे, यांचेसह पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.