नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:15 IST2021-02-05T06:15:22+5:302021-02-05T06:15:22+5:30
----------------------------- कुंभारी : येथील जय बजरंग विद्यालयात आझाद हिंद सेनेचे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जयंती कार्यक्रम ‘पराक्रम दिवस’ म्हणून ...

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर
-----------------------------
कुंभारी : येथील जय बजरंग विद्यालयात आझाद हिंद सेनेचे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जयंती कार्यक्रम ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य विलास इंगळे, तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य समितीचे जिल्हाध्यक्ष डॉ. रामेश्वर बरगट, पर्यवेक्षक संतोष गावंडे, ज्येष्ठ शिक्षक सुनील फोकमारे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची प्रस्तावना तथा सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक बी. एस. तायडे यांनी केले, तर आभार आशा ताडे यांनी मानले. याप्रसंगी विद्यालयातील रमेश अढाऊ, डॉ. सूर्यभान नागुलकर, अविनाश ढोरे, मीना आमले, धनंजय पुसेगावकर, बजरंग गावंडे, सीताराम शिंगाडे, रवी कल्याणकर, विजय शिंगाडे इत्यादी शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
-----------------------------
बोरगाव वैराळे : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा कार्यक्रम नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी जागेश्वर मंदिराच्या सभागृहात आयोजित केला होता. कार्यक्रमाची सुरुवात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. यावेळी विनायक वैराळे, अशोकराव वैराळे, राजेश्वर वैराळे, रामराव शेळके, राजू वैराळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ. रामदास गावंडे होते. यावेळी सुनील गावंडे, केशव वैराळे, मंगेश मानकर, शरद बोचे, शुभम गावंडे, माणिकराव वानखडे, हरिभाऊ दांगटे, पांडुरंग बाहकर, विठ्ठल डोंगरे, पुरुषोत्तम शेळके, प्रदीप वाकोडे, सुनील अमरावते, संदीप सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
----------------------
कुरणखेड येथे बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी
कुरणखेड : येथील श्री हनुमान चौक येथे शिवसेनेतर्फे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आझाद हिंद सेनेचे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सुनील चव्हाण, दिनेश बोळे, शैलेश सोनोने, रंजीत घोगरे, प्रशांत इंगळे, सुभाष राऊत, बाबू चीकार, अनिल चव्हाण, सुनील चव्हाण, अमन महल्ले, निशांत देशमुख, सुनील बोळे, ज्ञानेश्वर इंगळे, चंडिका माता युवा प्रतिष्ठाण अध्यक्ष मंगेश पावडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश विजयकर यांनी केले, तर आभार शैलेश सोनोने यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दीपक चिकार, शेखर हरसुलकर, किरण श्रीनाथ, गजानन अप्तुरकर, प्रल्हाद राऊत, अनिकेत देवरकर, शुभम चिकार, सुरेश उमाळे, बाला दहीकार, हरीश नागपुरे, रवी घोगरे, सुरज मोरे, गोकुळ बोळे, ऋषी सोनोने, यश गावंडे, नरेश चव्हाण, अभी पाटील, शुभम चव्हाण, रवी चव्हाण, सुरज चव्हाण, अजय वानखडे, निखिलेश विजयकर, तेजस विजयकर, अनिकेत गवरकर, आदित्य भेडकर, मयूर धानोरकर, ओम कुपटकर, अमोल इंगळे, शुभम वानखडे यांनी परिश्रम घेतले.
-------------------------------------