मारवाडी युवा मंचच्यावतीने रक्तदान शिबीर

By Admin | Updated: August 12, 2014 00:11 IST2014-08-11T23:30:47+5:302014-08-12T00:11:47+5:30

क्रांतीदिनाचे औचित्य साधून सहकारी ग्रामीण रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

Blood Donation Camp with Marwadi Youth Forum | मारवाडी युवा मंचच्यावतीने रक्तदान शिबीर

मारवाडी युवा मंचच्यावतीने रक्तदान शिबीर

वाशिम : सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या स्थानिक मारवाडी युवा मंच व महिला मिडटाउन शाखेच्या वतीने क्रांतीदिनाचे औचित्य साधून सहकारी ग्रामीण रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी २५१ जणांनी रक्तदान करुन राष्ट्रीय कार्याला हातभार लावला. यावेळी महिलांनी सुद्धा प्रत्यक्ष रक्तदान करुन राष्ट्रीय कार्यात आपला सहभाग नोंदविला. सदर शिबिरात विपीन बाकलीवाल, संजोग छाबडा, डॉ. चेतन अग्रवाल, राहुल झांझरी, अचल बज, गोविंद बंग, दीपक छाबडा, गोविंद राठी, सचिन राठी, पवन सारडा, मिलिंद सोमाणी, गोपाल बंग, अक्षय दारव्हेकर, विकी आमटे, सोनल सोमाणी, राहुल सोमाणी, विपुल चौधरी, सोनल सोनी, ज्योती सोमाणी, सारीका सोमाणी, प्रा. अंकुश सोमाणी, रंजीता गोधा, विपीन बज, हेमंत बज, हेमा सोमाणी, पियुष अग्रवाल आदिंनी रक्तदान केले. जिल्हा रक्तपेढी संक्रमण अधिकारी डॉ. चव्हाण समवेत कर्मचारी वृंद, मारवाडी युवा मंच शाखेचे पदाधिकारी, महिला मिडटाउनच्या पदाधिकार्‍यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पुढाकार घेतला. 

Web Title: Blood Donation Camp with Marwadi Youth Forum