लोकमत रक्ताचं नातं महायज्ञात १०५ युवकांचे रक्तदान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:23 IST2021-07-07T04:23:43+5:302021-07-07T04:23:43+5:30
कोविड परिस्थिती व रक्ताचा तुटवड्याचे गांभीर्य लक्षात घेता, संत गजानन महाराज मंदिर, गजानन नगर अकोट येथे आयोजित रक्तदान शिबिराचे ...

लोकमत रक्ताचं नातं महायज्ञात १०५ युवकांचे रक्तदान!
कोविड परिस्थिती व रक्ताचा तुटवड्याचे गांभीर्य लक्षात घेता, संत गजानन महाराज मंदिर, गजानन नगर अकोट येथे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी केले. याप्रसंगी माजी आमदार संजय गावंडे, प्रा. माया म्हैसने, दीपक बोचरे, पोलीस निरीक्षक संतोष महल्ले, ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड, माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे, नगरसेवक तथा गटनेते मनीष कराळे, राहुल कराळे, विक्रम जायले, रोशन पर्वतकार, साहेबराव भगत, डिगांबर सोळंके, सुभाष खिरकर, पत्रकार विजय शिंदे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी उपस्थिती मान्यवरांनी मनीष कराळे यांच्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन केले.
मनीष कराळे मित्र परिवाराच्या वतीने अकोट शहरासह तालुक्यात वर्षभर समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत असतात. त्यामध्ये कोविड काळातसुद्धा मनीष कराळे मित्रपरिवारातील सदस्यांनी सतत विविध उपक्रम हाती घेतले असून त्यामध्ये कोविड जनजागृती, गरजूंना धान्य वाटप, रुग्णसेवेसह मान्यवरांच्या हस्ते कोविड योद्ध्यांचा गौरव केला.
फोटो:
यांचे लाभले सहकार्य
रक्तदानाकरिता ठाकरे ब्लड बँकेचे डॉ. तोष्णीवाल, डॉ. संतोष सुलताने, मोहम्मद, दत्ताभाऊ गावंडे, अभि पाटील, मारोती धुळे, रजनी डोंगरे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संचालन विजय बेदरकर तर आभार विजय ढेपे यांनी मानले. रक्तदान शिबिराला मनीष कराळे मित्रपरिवार, कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
रक्ताचं नातं देशसेवा घडविणार!
राष्ट्रीय कीर्तनकार सत्यपाल महाराज यांनी मनीष कराळे यांनी लोकमत रक्ताचं नातं या मोहिमेत योगदान देत, केवळ वाढदिवस साजरे न करता, रक्तदान करून देशसेवेच्या कार्याला हातभार लावला. कोरोना योद्ध्यांचा सन्मान करून मनीष कराळे मित्रपरिवाराच्या वतीने असा समाजहिताचा उपक्रम आयोजित करून सामाजिक बांधीलकी जपत असल्याचे गौरवोद्गार सत्यपाल महाराज यांनी काढले.