शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
3
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
4
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
5
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
6
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
7
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
8
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
9
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
10
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
11
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
12
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
13
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
14
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
15
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
16
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
17
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
18
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
19
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
20
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष

नेत्रहिन धनश्रीचे ‘नेत्रदीपक’ यश...बारावीत ९२ टक्के गुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 17:04 IST

जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासच निर्माण करीत चक्क सर्वसामान्य विद्यार्थ्यांसोबत डोळस शाळेत शिकत तिने बारावीच्या २०१९ च्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळविले आहेत.

ठळक मुद्देअकोट येथील जलतारे प्लॉट येथील सोनल व अशोक हागे यांची मुलगी धनश्री ही जन्मत:च अंध आहे.बारावीच्या निकालात तीला ६५० पैकी ५९८ गुण मिळाले. अंध असल्याने तीला पुजा इंगळे हीने लेखणीक म्हणुन मदत केली.

- विजय शिंदेअकोट : दोन्ही डोळ्यांनी जन्मापासून अंध असलेल्या अकोटच्या धनश्री हागे या विद्यार्थीनीने शिक्षणात मात्र इंद्रधनुषी रंगांची उधळण करीत नेत्रदीपक यश मिळविले आहे. जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासच निर्माण करीत चक्क सर्वसामान्य विद्यार्थ्यांसोबत डोळस शाळेत शिकत तिने बारावीच्या २०१९ च्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळविले आहेत.अकोट येथील जलतारे प्लॉट येथील सोनल व अशोक हागे यांची मुलगी धनश्री ही जन्मत:च अंध आहे. तीने सूर्योदय आणि सूर्यास्त कधी पाहिला नाही. धनश्रीच्या दोन्ही डोळ्यात रेटिना नसल्याने तिच्यावर कोणताही उपचार शक्य नाही. मात्र तिच्या संवेदनेने आलौकिकतेचे दर्शन घडावे, असे कर्तृत्वतीने बारावीचे कला शाखेच्या परिक्षेत घडविले आहे. अकोट येथील भाऊसाहेब पोटे कनिष्ठ महाविद्यालयात कला शाखेत तीने कुठल्याही प्रकारचा कमीपणा न वाटू देता डोळस विद्यार्थ्यांसोबत वर्षभर जिद्दीने अभ्यास केला. बारावीची परिक्षा दिली असता २०१९ बारावीच्या निकालात तीला ६५० पैकी ५९८ गुण मिळाले. या मध्ये इंग्रजी ८४, मराठी ८९, इतिहास ९३, राज्यशास्त्र ९१, अर्थशास्त्र ९५, सहकार ९८, पर्यावरण ४८, गुण प्राप्त केले आहेत. अंध असल्याने तीने ११ वी कला शाखेचे पुजा इंगळे हीने लेखणीक म्हणुन मदत केली. तिचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.धनश्री आई-वडीलांच्या सहकार्याने धनश्री पहिल्या वर्गापासुनच सर्वसामान्य डोळस विद्यार्थ्यांसोबत शिकून प्रथम क्रमांकावर राहिली. अकोट येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर कोणत्याही अंध विद्यालयात व ब्रेंल लिपीच्या माध्यमातून न जाता स्थानिक नरसिंग विद्यालयामध्ये आठव्या वर्गात प्रवेश घेतला होता.विद्यालयातुन दहावीच्या परीक्षेत तिने ९४.८० टक्के गुण मिळवित घवघवीत यश संपादन केले होते. विद्यार्थीकरीता असलेल्या संगणकावर अभ्यास केला. बारावीच्या अभ्यासक्रमाच्या रेकॉर्डेड सिडी ऐकुण नंतर पाठातर करून घेण्याकरिता आई-वडीलांनी मेहनत घेतली. दररोज सतत तीन तास अभ्यास करून घेणे, शाळेत सोडणे, आणणे आदींसह तिला सर्वतोपरीने आई-वडील मदत करीत गेल्याने कधीही आपण अंध असल्याचा आभास झाला नसल्याचे धनश्रीने सांगितले. धनश्रीला गायन, संगीत व नृत्याची आवड आहे. अतिशय बोलकी असल्याने सर्वसामान्य विद्यार्थ्यासोबत शिकत असताना, वावरत असताना तिला कधी आपण अंध असल्याचे जाणवले नाही. बारावी शिक्षणाकरिता तिला आई-वडीलांसोबतच शिक्षण संस्थाचे अध्यक्ष भाऊसाहेब पोटे,सचिव शिरीष पोटे, प्राचार्य प्रविण रावणकर, वर्गशिक्षीका सुनिता अमृतकर व शिक्षकांनी चांगले मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले.धनश्रीला व्हायचेय जिल्हाधिकारीधनश्रीला यूपीएससी करून जिल्हाधिकारी व्हायचे आहे. माझ्याच सारख्या अनेक अंध मुली व समाजाची सेवा करायची आहे. जगात अशक्य काहीही नाही. मनात ध्यास जर घेतला तर आपले ध्येय निश्चितच गाठता येते. असा विश्वास धनश्रीने लोकमतशी बोलताना व्यक्त केला. 

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालAkolaअकोलाakotअकोट