बायोमेट्रीक थोपवेल सार्वजनिक वितरण प्रणालीतील काळाबाजार

By Admin | Updated: December 22, 2014 23:30 IST2014-12-22T23:30:00+5:302014-12-22T23:30:00+5:30

स्वस्त धान्य दुकाने होणार ऑनलाईन, शिधापत्रिका होणार संगणीकृत.

Black market in public distribution system; | बायोमेट्रीक थोपवेल सार्वजनिक वितरण प्रणालीतील काळाबाजार

बायोमेट्रीक थोपवेल सार्वजनिक वितरण प्रणालीतील काळाबाजार

वाशिम- सार्वजनिक वितरण प्रणालीतील काळाबाजार थोपविण्यासाठी सरसावलेल्या अन्न व पुरवठा विभागाने आता राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये बायोमॅट्रीक प्रणाली लावण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला असुन त्यासाठी स्वस्त धान्य दुकाने ऑनलाइन केली जाणार आहेत. संगणकीकृत यंत्रणेद्वारे ग्राहकांची, तसेच धान्य उचलल्याची माहितीही अपडेट होणार आहे. शिवाय ह्यथम्ब इम्प्रेशनह्ण तथा छायाचित्र काढल्याशिवाय लाभार्थ्यांना धान्य देण्यात येणार नाही.
राज्यातील गोरगरीब जनतेला स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व पुरवठा विभागाने सार्वजनिक वितरण प्रणाली विकसीत केली आहे. मात्र, झारीतील शुक्राचार्यांमुळे आजमितीला या प्रणालीमध्ये काळाबाजार करणार्‍यांचेच वर्चस्व वाढले आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीत लाभार्थ्यांच्या हक्काचे धान्य परस्पर लाटणारी यंत्रणा उभी झाल्यामुळे खर्‍या गरजूंपयर्ंत हे धान्य पोचत नाही. अनेक स्वस्त धान्य दुकानदार गरीबांच्या वाट्याचे हे धान्य परस्पर खासगी दुकानांमध्ये विकतात. याबाबत कुणी ओरड केली तरी, त्याचा आवाज दाबण्याचे कसब या धान्य माफियांना चांगल्याप्रकारे अवगत झालेले आहे. प्रत्यक्षात धान्य काळाबाजारात विकले जात असले तरी, कागदावर मात्र ग्राहकांनाच विकल्याची नोंद करण्यात येते. तशा पावत्याही तयार करण्यात येतात. कागदोपत्री ह्यरंगरंगोटीह्ण केल्याने पुरवठा विभागाच्या स्थानिक दप्तरी सुद्धा सर्व काही आलबेल असते.

Web Title: Black market in public distribution system;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.