विकासाची दिशा स्पष्ट करण्यासाठी भाजपचा ‘लोकसंवाद’
By Admin | Updated: September 21, 2014 01:36 IST2014-09-21T01:36:32+5:302014-09-21T01:36:32+5:30
४३ जणांनी नोंदविल्या सूचना, तक्रारी.

विकासाची दिशा स्पष्ट करण्यासाठी भाजपचा ‘लोकसंवाद’
अकोला : सर्वसामान्य जनतेच्या विचारातून भारतीय जनता पार्टीचा विकासनामा तयार करण्यासाठी ह्यलोकसंवादह्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शनिवारी भाजपच्या या उपक्रमामध्ये ४३ नागरिकांनी सूचना व तक्रारी मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने रस्ते, उद्योग व्यवसाय, विमानतळ विस् तारीकरण तसेच मनपा हद्दीतील चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) यावर भर देण्यात आल्याचे प्रकर्षाने दिसून आले.
विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर नागरिकांनी सूचना, समस्या व तक्रारी नोंदविण्यासाठी भाज पच्यावतीने ह्यलोकसंवादह्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लोकप्रतिनिधी सर्वच विषयातील जाणकार असू शकत नाही. नागरिकांमध्ये नकारात्मक भावना वाढीस लागली असून, ती दूर करण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याचे मत यावेळी खा.संजय धोत्रे यांनी व्यक्त केले.