शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
2
Top Marathi News LIVE Updates: बोरीवलीतील अॅनेक्स मॉलमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी
3
तुमच्या लोकांना कोर्टाबाबत बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा; न्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना सुनावलं
4
Zerodha च्या निखिल कामथ यांनी 'या' कंपनीत वाढवली गुंतवणूक, वृत्तानंतर स्टॉकमध्ये १८ टक्के तेजी
5
मुंबई महानगर क्षेत्रात ५०० MW क्षमतेचा 'ग्रीन एआय कॉम्प्युट हब'; १.१४ लाख कोटींची गुंतवणूक
6
Astro Tips: पैसे आणि समृद्धीसाठी पर्समध्ये ठेवा 'या' ५ शुभ गोष्टी; लाभेल लक्ष्मीचा वरदहस्त!
7
हवाई दलाची अधिकारी कशी झाली इराणची गुप्तहेर? मोनिका विटच्या 'ब्लॅक मिस्ट्री'चा थरारक खुलासा
8
उकाड्याने विजेची मागणी वाढली, वीज कंपन्यांवर ताण, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित!
9
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
10
भारतीय जहाज दुर्घटनेनंतर जयशंकर यांचा परराष्ट्र मंत्र्यांशी थेट संवाद; दिला महत्त्वाचा सल्ला
11
मुलांच्या भविष्याची चिंता मिटली! 'PPF'च्या माध्यमातून शिक्षण आणि लग्नासाठी उभा करू शकता लाखोंचा फंड; जाणून घ्या नियम
12
भारताच्या शेजारील देशात नेमकी काय परिस्थिती? पेट्रोल-डिझेलचे दर पाहून चक्रावून जाल...
13
मोबाईल देणं पडलं महागात! अल्पवयीन मुलाने आईच्या खात्यातून शेजाऱ्याला पाठवले ३३ लाख अन् पुढे जे झालं.. 
14
IPL 2026 Playoffs Race : RCB सह GT चं तिकीट 'कन्फर्म'; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चुरस
15
इराणची ‘मच्छर सेना’ अमेरिकेला ठरतेय भारी! का आहे इतकी खास?
16
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
17
चमत्कारिक प्रसूती! महिलेनं ५ दिवसांच्या अंतरानं दिला ४ बाळांना जन्म, आईसह मुलेही सुखरूप
18
प्रेमासाठी लेकीनेच केला घात; प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी कोट्यधीश बापाच्या घरातच मुलीने टाकला दरोडा
19
महाराष्ट्रात सुरू होणार एसआयआर, मतदारांना काय करावं लागेल? जाणून घ्या!
20
हडपसर बॉम्ब प्रकरणात मोठी कारवाई; नागपूर रेल्वे स्टेशनवरून संशयित ताब्यात; आणखी किती जण रडारवर?
Daily Top 2Weekly Top 5

सट्टा बाजारात भाजपचे भाव ‘जैसे थे’

By admin | Updated: May 13, 2014 00:17 IST

लोकसभा निवडणूक : केवळ पाच पैसे दर; सर्वात कमी भाव

अकोला : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात सोमवारी मतदान झाल्यानंतर सट्टा बाजारात भाजपचे दर सर्वात कमी असल्याची माहिती बुकींनी दिली. निवडणुकीच्या निकालाचा अंदाज घेण्यासाठी बुकी आणि सटोडियांनीही आपले घोडे दामटण्यास सुरुवात केली असून, अकोला मतदारसंघात सट्टा बाजाराचा कौल भाजपच्या उमेदवारालाच आहे.

अकोला मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारावर सर्वात कमी अर्थात पाच पैसे लावले जात आहे. हेच दर मतदानाच्या दुसर्‍या दिवशीही होते. अकोला लोकसभा मतदारसंघात १0 एप्रिल रोजी मतदान झाले. मतदान आटोपल्यानंतर सट्टा बाजारातील बुकी व सटोडियांनी भाजपच्या उमेदवारावर सर्वात कमी म्हणजे केवळ पाच पैशांचा भाव असल्याचे सांगितले होते. भारिप-बमसंच्या उमेदवाराला १५ पैशांचा भाव दिला जात असल्याची माहिती होती. काँग्रेस उमेदवारावरही काहींनी बोली लावली होती; परंतु काँग्रेस उमेदवाराला किती दर मिळत आहे, हे कोणीच ठामपणे सांगू शकले नव्हते. दरम्यान, सोमवारी देशभरात लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया संपली. या पृष्ठभूमीवर बुकी आणि सटोडियांशी चर्चा केली असता अकोला लोकसभा मतदासंघातील लढतीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले. काही बुकींनी कॉँग्रेस आणि भारिपवर पैसे लावल्या जात नसल्याचे सांगितले. विजयश्री खेचून आणण्याची दाट शक्यता असलेल्या भाजपच्या उमेदवाराबाबतच बोला, असे काही बुकी आणि सटोडिये म्हणाले. राजकीय विश्लेषकांच्या मते मात्र अकोला मतदारसंघात तिहेरी लढत होणार आहे. सट्टा बाजार बरोबर की राजकीय विश्लेषकांच्या अंदाज खरा होता, हे शुक्रवारी मतमोजणीच्या दिवशी स्पष्ट होईलच.