भाजपची संघटनात्मक बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:18 IST2021-02-10T04:18:16+5:302021-02-10T04:18:16+5:30
महिला बचत गटाच्या वतीने रमाईंना अभिवादन अकाेला उद्याेजिका महिला बचत गटाच्या वतीने माता रमाई यांना अभिवादन करण्यात आले. ...

भाजपची संघटनात्मक बैठक
महिला बचत गटाच्या वतीने रमाईंना अभिवादन
अकाेला उद्याेजिका महिला बचत गटाच्या वतीने माता रमाई यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सुजात वाहूरवाघ, माधुरी मानकर, वैशाली देशमुख, कांताबाई, लक्ष्मीबाई आदी उपस्थित हाेते.
भीम शक्ती तरूण मंडळाच्या वतीने अभिवादन
अकाेला डाॅ. बाबासाहेब आंबेडकरनगर मधील भीम शक्ती तरूण मंडळाच्या वतीने रमाई जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भज्जन तायडे आकाश गवई ज्ञानेश्वर निखाडे संताेष गवई संताेष सुरळकर आदी उपस्थितीत होते.
व्हीजेएनटी सेलच्या अध्यक्षपदी नवलकर
अकाेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्हीजेएनटी सेलच्या अध्यक्षपदी जयश्री नवलकर यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते नवलकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित हाेते.
शिवजयंती समितीच्या वतीने वाॅल पेंटींग स्पर्धा
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्त वाॅल पेंटींग स्पर्धा आयाेजित करण्यात आली आहे. १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान ही स्पर्धा शिवाजी पार्क येथे हाेणार आहे.