शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

भाजपची स्वबळावर चाचपणी; सर्वच मतदारसंघांसाठी मुलाखती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 14:04 IST

भाजपाने सर्वच मतदारसंघांत स्वबळाची चाचपणी सुरू केली असून, सोमवार, २ सप्टेंबर रोजी इच्छुकांच्या मुलाखती होत आहेत.

- राजेश शेगोकार लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी अकोल्यात सर्वच विद्यमान आमदारांना आशीर्वाद मागताना शिवसेनेचा साधा उल्लेखही केला नव्हता. त्यामुळे भाजप स्वबळावर तयारी करीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. दुसरीकडे युतीमधील जागा वाटपाबाबत दोन्ही पक्ष सकारात्मक असले तरी शिवसेनेनेही आपली सज्जता ठेवल्याचेही समोर आले आहे. या पृष्ठभूमीवर भाजपाने सर्वच मतदारसंघांत स्वबळाची चाचपणी सुरू केली असून, सोमवार, २ सप्टेंबर रोजी इच्छुकांच्या मुलाखती होत आहेत. भाजपचे पक्ष निरीक्षक ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे २ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांतील इच्छुकांशी व्यक्तिगत स्तरावर चर्चा करणार आहेत. या मुलाखती दरम्यान कोणत्याही इच्छुक उमेदवाराने शिष्टमंडळ किंवा शक्तिप्रदर्शन करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.अकोल्यात पाच विधानसभा मतदारसंघ असून, त्यापैकी चार मतदारसंघांत भाजपाचे आमदार आहेत. या चारही मतदारसंघांत आमदारांना स्पर्धक असले तरी उमेदवारीच्या बाबतीत विद्यमान आमदार ‘सेफ’ मानले जात आहेत. अकोला पूर्व व पश्चिम या दोन्ही विधानसभा मतदारसंघांवर केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांचे विशेष लक्ष असून, महापालिका क्षेत्रातील या मतदारसंघांनी महापालिका निवडणुकीत भाजपाच्या पारड्यात भरभरून मतदान केल्याने भाजपची एकहाती सत्ता प्रस्थापित झाली आहे. अकोला पूर्वमध्ये डॉ. अशोक ओळंबे, आशिष पवित्रकार यांना इच्छुक मानले जाते.तर पश्चिममध्ये आमदार गोवर्धन शर्मा यांनी सतत पाचव्यांदा विजय मिळवित विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी यावेळीही निश्चित मानली जात आहे; मात्र आ. शर्मा यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘हमारा कुछ खरा नही’, असे म्हटल्याने इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.या मतदारसंघात महापौर विजय अग्रवाल, हरिष अलिमचंदानी, अ‍ॅड. मोतिसिंह मोहता, डॉ. योगेश साहू यांची नावे चर्चेत आहे.आ. शर्मा यांचे पक्षातील वजन लक्षात घेता इच्छुक जाहीरपणे उमेदवारीची स्पर्धा रंगवित नसले तरी वरिष्ठांपर्यंत आपली इच्छा कशी पोहोचेल, याचा प्रयत्न करताना दिसतात. मूर्तिजापूर मतदारसंघात भाजपाचे आमदार हरीश पिंपळे यांना पक्षांतर्गतच स्पर्धा निर्माण झाली आहे. अकोला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रावण इंगळे यांना भाजपमध्ये सन्मानाने प्रवेश देऊन पिंपळे यांच्यासाठी पक्षानेच अंतर्गत स्पर्धक निर्माण केल्याची चर्चा आहे. अकोटमध्ये आमदार प्रकाश भारसाकळे यांच्याविरोधात भाजपमधील एक गट सक्रिय झाला असून, स्थानिक उमेदवार द्या, अशी मागणी रेटून धरली आहे. यासंदर्भात मतदारसंघात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी बैठका घेऊन केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे व पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांना निवेदन देऊन स्थानिक उमेदवाराचा आग्रह धरला आहे. या मतदारसंघात राजेश नागमते, जयश्री पुंडकर, पुरुषोत्तम चौखंडे, संतोष झुनझुनवाला, राजेंद्र पुंडकर यांची नावे इच्छुकांच्या यादीत आहे.

शिवसेनेसह शिवसंग्रामचाही दावाएकीकडे भाजप-शिवसेनेचे वरच्या फळीतील नेत्यांमध्ये युतीचे ‘नक्की ठरल्याचे’ सांगत असले तरी भाजपाच्या कोट्यातील जागांवर शिवसेनेसह शिवसंग्रामचाही दावा प्रभावी होत आहे. शिवसेनेचे युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जनआशीर्वाद यात्रा काढून शिवसेनेचा दावा असलेल्या मूर्तिजापूर व बाळापूर या मतदारसंघांतच सर्वाधिक वेळ दिल्याने किमान दोन मतदारसंघ शिवसेना पदरात पाडून घेईल, अशी चर्चा आहे. यापैकी बाळापूर मतदारसंघावर शिवसंग्रामचाही दावा आहे. येथे खुद्द भाजपा जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांचाच दावा असल्याने ही जागा भाजपासाठी प्रतिष्ठेची आहे. या पृष्ठभूमिवर मित्रपक्षांना सांभाळण्यासह आपल्याच पक्षातील इच्छुकांनाही समजवावे लागणार आहे. या दोन मतदारसंघांत भाजपचे कोणते दावेदार मुलाखतींना हजर राहतात, हे पाहणे रंजक ठरेल.जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांसाठी मुलाखती होणार आहे. पक्ष म्हणून आमची बांधणी जिल्हाभरात आहे. याचा फायदा युतीला होणार आहे. जागा वाटपाचा निर्णय झाल्यानंतर पक्ष आदेश देईल त्याप्रमाणे कार्यकर्ते सज्ज होतील.- तेजराव थोरातजिल्हाध्यक्ष, भाजपा

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारणAkolaअकोला