बंगालमधील हिंसाचाराचा भााजपकडून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:19 IST2021-05-07T04:19:00+5:302021-05-07T04:19:00+5:30
....................... जुन्या शहरात दोन पोलीस चौकी उभारा अकोला : जुन्या शहरात असामाजिक तत्त्व शांततेचा भंग करत आहेत. त्यांचा ...

बंगालमधील हिंसाचाराचा भााजपकडून निषेध
.......................
जुन्या शहरात दोन पोलीस चौकी उभारा
अकोला : जुन्या शहरात असामाजिक तत्त्व शांततेचा भंग करत आहेत. त्यांचा बंदोबस्त कायमचा करावा, अशी मागणी अकोला पश्चिमचे आमदार गोवर्धन शर्मा यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीधर यांना भेटून केली तसेच या परिसरात दोन पोलीस चौकी उभाराव्यात यासाठी आमदार निधीतून खर्च केला जाईल, अशी मागणी आमदार शर्मा यांनी केली. यावेळी दक्षिण पश्चिम मंडळ अध्यक्ष नीलेश निनोरे, गिरीराज तिवारी, गिरीश जोशी, संदीप वाणी, मनपा स्थायी समिती सभापती संजय बडोणे, वसंता मानकर, सुभाष मामा महसने, विलास शेळके, रमण पाटील, संदीप पवार, गणेश जकाते, कार्तिक शिरसोली उपस्थित होते.
००००००००००००००००
लसीकरण मोहिमेसाठी योग्य नियोजन करा
अकोला : स्थानिक पातळीवर राबविण्यात येणाऱ्या लसीकरण अभियानात नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. प्रत्येक केंद्रावर लसीची उपलब्धता पाहून किती नागरिकांचे लसीकरण होणार याबाबतची माहिती एक दिवस अगोदर केंद्रावर प्रदर्शित करावी. सुरक्षित अंतर पाळले जावे, अशी मागणी अ. भा. ग्राहक पंचायत संघटनमंत्री हेमंत जकाते, जिल्हाध्यक्ष मनोहर गंगाखेडकर, व्यापारी ग्राहक संघ प्रमुख मनोज अग्रवाल, महानगर कृती समिती अकोला अध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
००००००००००००००००
वाशिम बायपास चौकात पोलीस चौकी द्या
अकोला : वाशिम बायपास चौकात पोलीस चौकी उभारण्यात यावी, अशी मागणी उमेश इंगळे यांनी केली आहे. महानगर पालिकेची हद्द वाढली असून, नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या भागामुळे स्थानिक परिसरात वाढ झाली आहे. या चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू राहत असून, बाहेरील काही लोक विनाकारण वाद करतात. त्यामुळे वादाचे रूपांतर भांडणात होते व वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होतो, असे इंगळे यांनी म्हटले आहे
००००००००००००००००
संत कचरुजी महाराज जन्मोत्सव साधेपणाने
अकोला : म्हैसांग येथील संत कचरुजी महाराज यांचा जन्मोत्सव साधेपणाने साजरा केला जाणार आहे. कोरोना संकट बघता यावर्षीचा उत्सव व श्रींची यात्रा रद्द करण्यात आली आहे. भक्तांनी आपल्या घरीच हा उत्सव साजरा करण्याचे आवाहन संस्थानचे अध्यक्ष मिलिंद देशमुख, उपाध्यक्ष अशोक वानखडे, सचिव विजय देशमुख यांनी केले आहे.
००००००००००००००००
कोविड चाचणीसाठी मोफत बस उपलब्ध
अकोला : जिल्हाधिकारी यांच्या आवाहनानुसार, कोविड चाचणीसाठी फिरते स्वॅब संकलन केंद्र कार्यान्वित करता यावे यासाठी येथील ट्रॅव्हल्स या संस्थेने संस्थेची एक बस विनामूल्य उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, दि. १ पासून ही बस कार्यान्वित असून, सद्य:स्थितीत अकोला शहरात विविध ठिकाणी जाऊन लोकांचे स्वॅब संकलन करण्यासाठी या बसची मोलाची मदत होत आहे.
००००००००००००००००
आनंद तायडे यांना चांदीचे पदक
अकोला : बँक ऑफ महाराष्ट्रने बँकेची पंचवीस वर्षे उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल झोनल असिस्टंट सेक्रेटरी आनंद काशिनाथ तायडे यांना मंगळवारी चांदीचे पदक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रतिनियुक्त मॅनेजर उज्ज्वल कुमार, बँक अधिकारी सचिन शिरसागर, शारदा कडू, पराग साठे, अमरकुमार तायडे, अक्षय तायडे उपस्थित होते.
००००००००००००००००