भाजपला कारेाना रुग्णांपेक्षा राजकारण महत्त्वाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:19 IST2021-04-21T04:19:16+5:302021-04-21T04:19:16+5:30
अकाेला : रेमडेसिविरचा साठा परदेशात निर्यात हाेणार हाेता ही कुणकूण लागल्यामुळेच मुंबई पाेलिसांनी संबंधित कंपनीच्या संचालकांना चाैकशीसाठी ताब्यात घेतले ...

भाजपला कारेाना रुग्णांपेक्षा राजकारण महत्त्वाचे
अकाेला : रेमडेसिविरचा साठा परदेशात निर्यात हाेणार हाेता ही कुणकूण लागल्यामुळेच मुंबई पाेलिसांनी संबंधित कंपनीच्या संचालकांना चाैकशीसाठी ताब्यात घेतले हाेते मात्र भाजपाला देशातील काेराेना रुग्णांपेक्षा राजकारण महत्त्वाचे वाटल्याने ही निर्यात थांबू नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी रात्री पाेलीस स्टेशनमध्ये धाव घेतल्याचा आराेप वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.
अकाेला जिल्हा परिषद उपाध्यक्षांच्या निवासस्थानी मंगळवारी आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. ॲड. आंबेडकर म्हणाले की, रेमडेसिविरच्या मुद्द्यावर सध्या राजकारण रंगले आहे. आपल्या देशातील माणसे वाचविणे सर्वात आधी महत्त्वाचे असताना लसींचेही वाटप परेदशात आधी झाले तसाच प्रकार रेमडेसिविरबाबत हाेत असल्याचा आराेप त्यांनी केला. केंद्र सरकारने काेराेना रुग्णांसाठी वापरत असलेल्या औषधांचा किती साठा देशात आहे त्या पैकी परदेशात किती निर्यात केला, हे जाहीर करावे असे आव्हानही त्यांनी दिले.
बाॅक्स...
निर्बंधांबाबत केंद्र व राज्यात विराेधाभास
काेराेना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आदर्श अशी एसओपी तयार करण्यात आलेले नाही. दुसरीकडे निर्बंधांबाबत केंद्र व राज्यात विराेधाभास असून हे नियम जागतिक आराेग्य संघटनेने घालून दिलेल्या नियमांनाही छेद देतांना दिसत असल्याचा आराेपही आंबेडकर यांनी केला.