भाजप, राकॉँकडून मराठा कार्डचा वापर !
By Admin | Updated: September 29, 2014 02:07 IST2014-09-29T02:07:53+5:302014-09-29T02:07:53+5:30
अकोला जिल्ह्यात ‘सोशल इंजिनिअरिंग’ला तिलांजली.

भाजप, राकॉँकडून मराठा कार्डचा वापर !
अजय डांगे / अकोला
जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांत भाजप आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसने मराठा कार्डचा वापर केल्याचे उमेदवारांवर नजर टाकल्यास दिसून येते. अकोला पूर्व, बाळापूर आणि आकोटमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसने अकोला पश्चिम, आकोट व अकोला पूर्व मतदारसंघात मराठा समाजातील उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे ह्यसोशल इंजिनिअरिंगह्णच्या गप्पा मारणार्या दोन्ही पक्षांपुढे इतर समाजातील मतं खेचण्याचे आव्हान उभे ठाकणार आहे.
शिवसेना-भाजप महायुती आणि कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यात प्रचंड राजकीय उलथापालथ झाली. महायुती आणि आघाडीतील चारही पक्षांकडून सक्षम उमेदवारांचा शोध सुरू झाला. काही नेत्यांनी इतर पक्षातून उमेदवार आयात करण्यासाठीही चाचपणी केली. स्वपक्षाने उमेदवारी नाकारलेल्या इच्छुकांनीही इतर पक्षांशी संपर्क साधला.
दरम्यान, आघाडी आणि महायुती तुटल्याने चारही पक्षातील नेत्यांनी स्वत:च्या सर्मथकांच्या पदरात उमेदवारी कशी पडेल, यासाठी ह्यफिल्डिंगह्ण लावली. काहींनी तर त्यासाठी प्रतिष्ठेचा मुद्दा केला. सम र्थकांना पुढे करताना नेत्यांनी केवळ स्वत:च्या समाजाचा विचार केला. इतर समाजातील इच्छुकांना संधी देण्याचा विसर त्यांना पडल्याचे दिसून येते. भाजपने पाचपैकी अकोला पूर्व, बाळापूर आणि आकोट या तीन मतदारसंघातून मराठा उमेदवारांना संधी दिली. मूर्तिजापूर मतदारसंघ राखीव असून, अकोला पश्चिम मतदारसंघातून हिंदी भाषिक उमेदवार उभा केला. भाजपप्रमाणेच राष्ट्रवादी कॉँग्रेसनेही मराठा कार्डचा वापर केला. अकोला पूर्व, आकोट आणि अकोला पश्चिममधून मराठा समाजातील उमेदवारांना तिकिटं दिली. एरव्ही ह्यसोशल इंजिनिअरिंगह्णच्या गप्पा करणार्या दोन्ही पक्षांची इतर समाजातील मतं खेचण्यासाठी कसोटी लागणार आहे.