भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांना कोरोनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 10:53 IST2020-09-26T10:53:24+5:302020-09-26T10:53:36+5:30
त्यांना अकोला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांना कोरोनाची लागण
अकोला : भारतीय जनता पक्षाचे अकोट मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती शनिवारी समोर आली आहे. त्यांच्यासोबतच त्यांच्या स्विय सहायकासही कोरोनाची बाधा झाली आहे. प्रकाश भारसाकळे हे अकोला येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
मुळचे दर्यापूर येथील असलेले प्रकाश भारसाकळे हे गत काही महिन्यांपासून त्यांच्या दर्यापूर येथील निवासस्थानीच आहेत. गत चार - पाच दिवसांपूर्वी प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांनी कोरोना चाचणी करून घेतली असता, त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांना अकोला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या स्विय सहायकाचाही अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांनाही याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे समजते.