पक्ष सोडून गेलेल्यांच्या उपस्थितीने उंचावल्या भाजप नेत्यांच्या भुवया!
By Admin | Updated: November 24, 2014 01:41 IST2014-11-24T01:41:57+5:302014-11-24T01:41:57+5:30
एकनाथ खडसे यांच्या भेटीसाठी नेत्यांची विश्रामगृहावर गर्दी.

पक्ष सोडून गेलेल्यांच्या उपस्थितीने उंचावल्या भाजप नेत्यांच्या भुवया!
अकोला- दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अकोला दौर्यावर आलेले महसूल व कृषिमंत्री एकनाथ खडसे यांच्या भेटीसाठी रविवारी शासकीय विश्रामगृहावर जिल्ह्यातील भाजप ने त्यांनी गर्दी केली होती. या गर्दीत भाजप सोडून गेले आणि भाजप उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढविणार्या नेत्याला बघून जिल्ह्यातील उपस्थित भाजप नेत्यांच्या भुवया उंचावल्या.
ना. खडसे यांची अकोला जिल्ह्यासोबत पूर्वीपासूनच जवळीक राहिली आहे. त्यांचे भाऊ अकोल्यात राहत असल्याने त्यांचे येथे नेहमीच येणे-जाणे सुरू असते. यातूनच त्यांचे जिल्ह्यातील भाजप नेत्यांसोबत जिव्हाळ्य़ाचे संबंध निर्माण झाले आहेत. हा जिव्हाळा नाथाभाऊंनी तर जपलाच पण त्यांच्या सर्मथक नेत्यांनीही जपला आहे. त्यामुळेच दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि खासगी कार्यक्रमात सहभागी होण्याच्या निमित्ताने नाथाभाऊ अकोल्यात आले असता त्यांच्या भोवती भाजप नेत्यांची गर्दी झाली. आढावा बैठकीनंतर सायंकाळी ते काही वेळासाठी शासकीय विश्रामगृहात थांबले होते. यावेळी त्यांनी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून निवेदनही स्वीकारले. जिल्ह्यातील भाजपचे चारही आमदार यावेळी विश्रामगृहावर उपस्थित होते. याशिवाय पक्ष संघटनेतील काही नेते व पदाधिकारीसुद्धा त्यांच्या भेटीसाठी आले होते. या गर्दीतच भाजप सोडून गेलेले माजी आमदार नारायणराव गव्हाणकरसुद्धा होते. त्यांनी नाथाभाऊंची भेट घेऊन त्यांना शे तकर्यांच्या प्रश्नाबाबत निवेदन दिले. गव्हाणकर यांना बघून ना थाभाऊंनी उत्स्फूर्तपणे त्यांचे स्वागत केले. गव्हाणकर आज तुम्ही भाजपमध्ये असते तर माझ्यासोबत मंत्रिमंडळात असते, असा टोलाही त्यांना लावला. यावेळी नाथाभाऊंनी त्यांना मुंबईला येण्याचे निमंत्रण दिल्याने तेथे उपस्थित भाजप नेत्यांच्या भुवया उंचावल्या. मुंबईचे आमंत्रण गव्हाणकरांना कशासाठी दिले, याबाबत चांगलीच चर्चा भाजप वतरुळात रंगली होती.