अकोला : भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या ६८ व्या जयंतीनिमित्त त्यांना अकोला येथील भाजपा कार्यालयात भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. यावेळी खासदार संजय धोत्रे यांनी मुंडे यांचे जीवनकार्य भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शक असल्याचे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, डॉ. रामदास आंबटकार,संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठीकार, महानगर अध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी मुंडे यांना आदरांजली अपर्ण केली. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त शहरात व जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांचा आदर्श अंगीकार करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात संजय जीरापुरे, धनंजय गिरीधर, डॉ.विनोद बोर्डे, अनुप गोसावी, हेमंत शर्मा, जानव्ही डोंगरे, संतोष डोंगरे, सुजित सिंह ठाकूर, अजय शर्मा, राजेंद्र गिरी, अॅड. देवाशीष ठाकूर, विजय इंगळे, दिप मनवानी, हिरालाल कृपलानी, राजेश चौधरी, रमेश कटिहार, सुनील शिरसाट, अक्षय अलमेकार, सुमन गावंडे, वैशाली शेळके, सारिका जैस्वाल, चंदा शर्मा, गीतांजली शेगोकार, वर्षा गावंडे , रोहित खोवाल, संजय गोठपोडे,आम्रपाली उपर्वट ,सिद्धार्थ वरोठे,अमोल गीते, अमोल गोगे, टोलू जैस्वाल, वामन भिसे, वैकुंठराव ढोरे, अक्षय गंगाखेडकर, बाळू सोनोने, हरीश अमानकर, अनिल मुरूमकर, धनंजय धबाले, अभिजित बांगर आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन डॉ विनोद बोर्डे, प्रास्ताविक धनंजय गिरीधर,आभार प्रदर्शन संजय जीरापुरे यांनी केले.
अकोल्यात भाजपच्यावतीने लोक नेते गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 14:44 IST
अकोला : भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या ६८ व्या जयंतीनिमित्त त्यांना अकोला येथील भाजपा कार्यालयात भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.
अकोल्यात भाजपच्यावतीने लोक नेते गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली
ठळक मुद्देखासदार संजय धोत्रे यांनी व्यक्त केले मनोगत.आ. रणधीर सावरकर, आ. गोवर्धन शर्मा यांची प्रमुख उपस्थिती .