भाजप सरकारने शेतकरी, शेतमजुरांना कंगाल केले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 01:10 IST2017-08-26T01:10:27+5:302017-08-26T01:10:36+5:30
गेल्या तीन वर्षांपासूनचा दुष्काळ, नापिकी व सरकारी धोरण, शेतमालाला मिळालेल्या कमी भावामुळे शेतकरी, शेतमजुरांची आर्थिक स्थिती कमकुवत झाली आहे. अशातच सरकारने अचानक कॅशलेस केल्यामुळे तर सगळ्याच शेतमालाचे भाव एकाच फटक्यात निम्म्यावर आणून शेतकर्यांना कंगाल केले असल्याची टीका किसान मंचचे निमंत्रक शेतकरी नेते शंकरअण्णा धोंगडे यांनी केली. कानडी येथील शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियानात झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

भाजप सरकारने शेतकरी, शेतमजुरांना कंगाल केले!
लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर : गेल्या तीन वर्षांपासूनचा दुष्काळ, नापिकी व सरकारी धोरण, शेतमालाला मिळालेल्या कमी भावामुळे शेतकरी, शेतमजुरांची आर्थिक स्थिती कमकुवत झाली आहे. अशातच सरकारने अचानक कॅशलेस केल्यामुळे तर सगळ्याच शेतमालाचे भाव एकाच फटक्यात निम्म्यावर आणून शेतकर्यांना कंगाल केले असल्याची टीका किसान मंचचे निमंत्रक शेतकरी नेते शंकरअण्णा धोंगडे यांनी केली. कानडी येथील शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियानात झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
किसान मंचच्यावतीने आयोजित केलेल्या शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियानांतर्गत अकोला जिल्ह्यातील कानडी येथे मेळावा व बैठक आयोजित करण्यात आली होती. मेळाव्याला संबोधित करताना धोंगडे यांनी भाजप, सेना सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, की शेतकरी ऊठसूट किंवा मागायचे म्हणून मागत नाही तर शेतकरी, शेतमजूर व ग्रामीण कष्टकर्यांवर यापूर्वी कधी नव्हे एवढे आर्थिक अरिष्ट ओढवल्याने ते कर्जमाफीची मागणी करीत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस व त्यांचे सहकारी निवडणुकीपूर्वी दिलेली वचने व आश्वासने पूर्ण करण्याऐवजी टिंगलटवाळी व कुचेष्टा करण्यातच धन्यता मानत आहेत, असे ते म्हणाले.
धोंगडे हे किसान मंच (महाराष्ट्र)चे निमंत्रक असून, त्यांचे अभियान ५५ दिवसांचे आहे. राज्यातील ३0 जिल्ह्यातून फिरून अभियानाचा समारोप २ ऑक्टोबर रोजी होणार्या नाशिकच्या शेतकरी मेळाव्यात होणार आहे. शेतकरी, शेतमजुरांसाठी सरकारकडे केलेल्या मागण्या सरकारने पूर्ण न केल्यास नाशिकच्या शेतकरी अधिवेशनात सरकारच्या विरोधात मोठे आंदोलन केल्या जाणार असल्याचे त्यांनी भाषणात सांगितले.
या मेळाव्याचे आयोजन शेतकरी जागर मंचच्यावतीने करण्यात आले होते. किशोर माथनकर किसान मंच संयोजक व प्रशांत गावंडे जागर मंच यांनी या सभेत मार्गदर्शन केले. या मेळाव्यात मनोज तायडे, जगदीश मुरूमकर, जि. प. सदस्य सम्राट डोंगरदिवे, अशोक लोडम, वसंतराव माळोकार, पंजाबराव गावंडे, बाळकृ ष्ण पाटील, शिवाजी म्हैसने, शेख अन्सार आदी उपस्थित होते.