वाशिम, रिसोड व मालेगावात भाजपाचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 02:00 PM2019-11-23T14:00:50+5:302019-11-23T14:01:14+5:30

जिल्हयातील वाशिम, रिसोड व मालेगाव येथे भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्याने भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, मिठाई वाटप करुन जल्लोष केला.

BJP cheers in Washim, Risod and Malegaon | वाशिम, रिसोड व मालेगावात भाजपाचा जल्लोष

वाशिम, रिसोड व मालेगावात भाजपाचा जल्लोष

googlenewsNext

भाजपाचे मुख्यमंत्री झाल्याने आनंद। फटाक्यांची आतषबाजी
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम :   जिल्हयातील वाशिम, रिसोड व मालेगाव येथे भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्याने भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, मिठाई वाटप करुन जल्लोष केला.
वाशिम येथे आमदार लखन मलिक यांनी त्यांच्या कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करुन वाजत गाजत शहरातून मिरवणूक काढली.  सदर मिरवणुकीस शिवाजी महाराज चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळयापासून करण्यात आली. सर्वप्रथम शिवाजी महाराजांच्या पुतळयास हारार्पण करण्यात आले. नंतर मिरवणुक प्रमुख मार्गावरुन वाजत गाजत काढण्यात आली. यावेळी आमदार लखन मलिक , बापु ठाकुर, नितेश मलिक, राहुल तुपसांडे, धनंजय हेंद्रे,  धनंजय रणखांब, मनिष मंत्री, रामा इंगळे, राजगुरु यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते.
रिसोड येथे ही भाजपाच्यावतिने फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष करण्यात आला. रिसोड येथील गुजरी चौकामधील शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस हारार्पण करुन फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व नागरिकांना मिठाई वाटप करण्यात आली.  कार्यक्रमास जिल्हाउपाध्यक्ष नारायणराव सानप, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील, सुनिल बेलोकार, अमोल लोथे,  विनोद जोशी, रमेश बगडीया, उध्दवराव खरबळ, मनोज अनसिंगकर , नामदेव पाटील हुंबाड,  कैलास शिंगणे, पवन जोशी यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते.
मालेगाव शहरात जुन्या बस स्थानकावर शेकडो पदाधिकाºयाच्या व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य फटाक्यांची आतिषबाजी करून ढोल-ताशे वाजवून जल्लोष करण्यात आला.   यावेळी प्रदेश सदस्य गोपाल पाटील राऊत यांच्यासह श्याम  बढ,े अरुण गवळी ,संतोष तिख,े संदीप पिंपळकर ,डॉ राजीव मुंदडा, तेजस आरू ,वसीम पठाण ,अमोल लहान,े मुन्ना मुंदडा ,मधु ओझा, नामदेव बोरचाटे ,दिलीप महाजन, किशोर महाकाळ , नंदू यादव ,मोहन बळी , संतोष घुग,े राजू बळी , अमोल लादे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: BJP cheers in Washim, Risod and Malegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.