दोन ट्रॅक्टरमध्ये विचित्र अपघात; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2016 02:43 IST2016-09-01T02:43:01+5:302016-09-01T02:43:01+5:30

बोरगावमंजुजवळ राष्ट्रीय महामार्गावर अपघात.

Bizarre accidents in two tractors; One killed | दोन ट्रॅक्टरमध्ये विचित्र अपघात; एक ठार

दोन ट्रॅक्टरमध्ये विचित्र अपघात; एक ठार

अकोला, दि. ३१ : नागपूरवरून दोन नवीन ट्रॅक्टर बुलडाणा जिल्हयातील मलकापूर येथे पोहोचविण्यात येत असताना या दोन ट्रॅक्टरमध्ये विचित्र अपघात घडल्याची घटना बुधवारी रात्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ घडली. या अपघातात एका ट्रॅक्टरचा चालक ठार झाला असून, दुसर्‍या ट्रॅक्टरचा चालक गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
उत्तर प्रदेशातील रहिवासी कन्हैया शर्मा व शमी खान हे दोघे नागपूर येथे एस्कॉर्ट ट्रॅक्टर कंपनीमध्ये चालक म्हणून कामगार आहेत. हे दोघेही बुधवारी दोन नवीन ट्रॅक्टर नागपूरवरून मलकापूर येथे पोहोचविण्यासाठी निघाले होते. बाभूळगावनजीक आल्यावर कन्हैया शर्मा हा त्याचा ट्रॅक्टर घेऊन शमी खानच्या ट्रॅक्टरला मागे टाकण्याचा प्रयत्न करीत असतानाच शमी खानच्या ट्रॅक्टरच्या मागील टायरमध्ये कन्हैयाच्या ट्रॅक्टरचा समोरील भाग अडकला. यामध्ये कन्हैया शर्मा याच्या छातीवर जबर मार लागल्ली. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, तर शमी खान हा गंभीर जखमी झाला.

Web Title: Bizarre accidents in two tractors; One killed