शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर ‘बायोमेट्रिक मशीन’चा उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 12:37 IST

दांडीबहाद्दर कर्मचाºयांसह शिक्षक व सफाई कर्मचाºयांना वेसण घालण्यासाठी महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी ‘बायोमेट्रिक मशीन’चा ठोस तोडगा काढला आहे.

ठळक मुद्देअधिकारी-कर्मचाºयांच्या दैनंदिन हजेरीसाठी मनपामध्ये ‘बायोमेट्रिक’ मशीन कार्यान्वित केल्या. आयुक्त जितेंद्र वाघ यांनी आता झोन कार्यालयांमध्ये हजेरीसाठी अत्याधुनिक ‘बायोमेट्रिक’ मशीन लावण्याचा निर्णय घेतला आहे.

अकोला : महापालिकेच्या काही कामचुकार व दांडीबहाद्दर कर्मचाºयांमुळे प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाºया इतर कर्मचाºयांच्या कार्यप्रणालीवर नाहक शंका उपस्थित केली जाते. यामुळे त्यांचे मनोधैर्य कमी होऊन त्याचा परिणाम कामकाजावर होतो. अशा दांडीबहाद्दर कर्मचाºयांसह शिक्षक व सफाई कर्मचाºयांना वेसण घालण्यासाठी महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी ‘बायोमेट्रिक मशीन’चा ठोस तोडगा काढला आहे. त्यासाठी निविदा प्रकाशित केली असून, काही कंपन्यांनी सादर केलेल्या निविदा लवकरच उघडल्या जाणार असल्याची माहिती आहे.शहरात झोन कार्यालयांचे गठन होण्यापूर्वी महापालिकेत एकाच छताखाली प्रशासकीय कामकाज पार पडत होते. साहजिकच मनपात विविध कामानिमित्त येणाºया नागरिकांना वरिष्ठ अधिकारी, विभाग प्रमुख तसेच संबंधित कर्मचारी उपलब्ध होणे अपेक्षित होते; परंतु अनेक अधिकारी, कर्मचारी मनपाच्या प्रशासकीय कामाची सबब पुढे करून कामावरून पळ काढत असल्याचे चित्र होते. ही बाब लक्षात घेता प्रशासनाने झोन कार्यालयांचे गठन करून त्या ठिकाणी विद्युत, पाणी पुरवठा, कर वसुली, साफसफाई आदींसह विविध सुविधा उपलब्ध करून देत अधिकारी-कर्मचाºयांच्या नियुक्त्या केल्या, तसेच अधिकारी-कर्मचाºयांच्या दैनंदिन हजेरीसाठी मनपामध्ये ‘बायोमेट्रिक’ मशीन कार्यान्वित केल्या. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. यादरम्यान, झोन कार्यालयांवर नियुक्त केलेले कर्मचारी तसेच सकाळी शहरात दैनंदिन साफसफाई करणारे सफाई कर्मचारी कर्तव्यापासून पळ काढत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. अशा दांडीबहाद्दर कर्मचाºयांना वेसण घालण्यासाठी मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांनी आता झोन कार्यालयांमध्ये हजेरीसाठी अत्याधुनिक ‘बायोमेट्रिक’ मशीन लावण्याचा निर्णय घेतला आहे.शिक्षकांना लागणार लगाम!सकाळ किंवा दुपारच्या शालेय सत्रात काम करणारे शिक्षक-मुख्याध्यापक शाळा सुरू झाल्यानंतर काही वेळातच शाळेतून पळ काढतात. अशा शाळांची आकस्मिक पाहणी केली असता कुटुंबातील व्यक्तींच्या आजारपणाचे दाखले दिले जातात. मनपाचा शिक्षण विभाग काही विशिष्ट शाळांचीच तपासणी करण्यापुरता मर्यादित झाला असल्याने इतर शाळांवरील शिक्षक या बाबीचा फायदा घेतात. हा प्रकार लक्षात आल्यामुळे आयुक्त जितेंद्र वाघ यांनी मनपा शाळांमध्येही ‘बायोमेट्रिक’ मशीन कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून कामचुकार शिक्षकांवर लगाम लावल्या जाणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका