दुचाकी झाडावर आदळली; एक0 गंभीर
By Admin | Updated: April 21, 2017 01:48 IST2017-04-21T01:48:05+5:302017-04-21T01:48:05+5:30
महान : मूर्तिजापूर तालुक्यातील शेलूबाजार येथील तीन युवक लग्नकार्यासाठी आगीखेडला जात असताना महान-पातूर मार्गावरील हलदोली शिवारात त्यांची दुचाकी झाडावर आदळली.

दुचाकी झाडावर आदळली; एक0 गंभीर
महान : मूर्तिजापूर तालुक्यातील शेलूबाजार येथील तीन युवक लग्नकार्यासाठी आगीखेडला जात असताना महान-पातूर मार्गावरील हलदोली शिवारात त्यांची दुचाकी झाडावर आदळली. यामध्ये ते तिघेही जखमी झाल्याची घटना २० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता घडली. आगीखेड (ता. पातूर) येथे लग्नकार्यासाठी जात असलेल्या शेलूबाजार येथील तीन युवक एमएच ३७ वाय २४३८ क्रमांकाच्या मोटारसायकलने हलदोली शिवारातील वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने मोटारसायकल रस्त्याच्या कडेला झाडावर आदळली. या अपघातामध्ये मोटारसायकलवरील एक युवक गंभीर जखमी झाला.