फटका कारखान्यात मोठा स्फोट, एकाचा घटनास्थळी मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2023 13:19 IST2023-03-28T13:18:16+5:302023-03-28T13:19:01+5:30
मिळालेल्या माहितीनुसार फटाखा कारखाना भांडारज शेतशिवरात असून घटना मंगळवार रोजी सकाळी दहाच्या सुमारास घडली.

फटका कारखान्यात मोठा स्फोट, एकाचा घटनास्थळी मृत्यू
- राहुल सोनोने
वाडेगाव : पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या तांदळी बेलुरा मार्गावर फटाका कारखान्यात स्फोट होऊन एकाचा मृत्यू तर पाच ते सहा जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार फटाखा कारखाना भांडारज शेतशिवरात असून घटना मंगळवार रोजी सकाळी दहाच्या सुमारास घडली.
फटाक्यांसाठी बांधलेल्या खोल्यामध्ये स्फोट झाल्याने येथे उपस्थित असलेल्या मजुरामध्ये रजाकभाई (वय ६०) यांचा छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह आढळला. तसेच यामध्ये काही मजूर गंभीर असून जखमी झाले. यात धम्मपाल सीताराम खंडेराव, मंगेश भीमराव खंडेराव, रिना मंगेश खंडेराव, दादाराव नवघरे, सुरेश नामदेव दामोदर यांचा समावेश आहे. हे सर्व तांदळी येथील रहिवासी आहेत. सर्वजण फटाका कारखान्यात काम करीत होते.
फटकाच्या स्फोटामुळे खोल्या पूर्णपणे पूर्णपणे जमीनदोस्त झाल्या आहेत. तसेच चारचाकी मालवाहन सुद्धा जळून खाक झाले आहे. दरम्यान, या स्फोटात जखमी झालेल्या व्यक्तींना अकोला येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. पुढील तपास पातूर पोलीस स्टेशन करीत आहेत.