बिबट आला रे आला..

By Admin | Updated: April 14, 2015 00:55 IST2015-04-14T00:55:36+5:302015-04-14T00:55:36+5:30

पोलिस मुख्यालयात धावपळ!

Bibt aur ray nala .. | बिबट आला रे आला..

बिबट आला रे आला..

अकोला : वादळी वारा, पाऊस अन रात्री दहा वाजेची वेळ...भरवस्तीमधून पोलिस मुख्यालयात बिबट शिरल्याचे चर्चा...तीन तासांची शोधमोहीम...सर्वत्र शोधाशोध केल्यानंतर तो बिबट नसून रानटी मांजर असल्याचे आढळून आल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला !
त्याचे असे झाले की, शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास भरवस्तीत असलेल्या पोलीस मुख्यालयात रस्त्यावरून बिबट जात असल्याचे काही नागरिकांना दिसले. त्यांनी याबाबत इतरांना माहिती दिली. बिबट आला रे आला.. म्हणून सर्वजण एकमेकांना सांगत सुटले. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले. परिसरातील जवळपास १५0 लोक या ठिकाणी एकत्र आले आणि ह्यमिशन बिबटह्ण सुरु झाले. एका झाडावर बिबट असल्याचे नागरिकांना दिसल्यानंतर त्यांनी वनविभागाचे उप वनसंरक्षक लोणकर यांना याबाबत माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एस. कातखेडे यांना घटनास्थळावर पोहचले. वनविभागाच्या अधिकार्‍यांनी खात्री करुन झाडावर असलेला पट्टेदार त्वचेचा प्राणी बिबट नसून, जंगली मांजर असल्याचे सांगितले. तेव्हा सर्वांनी सुटकेचा निश्‍वास सोडला. या तीन तासाच्या बिबट नाट्याची शहरात एकच चर्चा होती.

Web Title: Bibt aur ray nala ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.