हनुमान व्यायामशाळेत सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:17 IST2021-03-15T04:17:23+5:302021-03-15T04:17:23+5:30

हनुमान व्यायामशाळेला सभागृह देण्याची मागणी नगरसेवक विनायक गुल्हाने यांनी आमदार गोपीकिशनजी बाजोरिया यांच्याकडे केली होती. आमदार बाजोरिया यांनी ...

Bhumi Pujan of Social Hall at Hanuman Gymnasium | हनुमान व्यायामशाळेत सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन

हनुमान व्यायामशाळेत सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन

हनुमान व्यायामशाळेला सभागृह देण्याची मागणी नगरसेवक विनायक गुल्हाने यांनी आमदार गोपीकिशनजी बाजोरिया यांच्याकडे केली होती. आमदार बाजोरिया यांनी स्थानिक विकास निधीतून हनुमान व्यायामशाळेच्या सामाजिक सभागृहासाठी २५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्या कामाचा भूमिपूजन सोहळा रविवार, दि. १४ मार्च रोजी पार पडला. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख संगीत कांबे, शिवसेना शहर प्रमुख तथा नगरसेवक विनायक गुल्हाने, नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे, उपनगराध्यक्ष सुनील महादेवराव पवार, समाजसेवक कैलाश महाजण, कमलाकर गावंडे, नगरसेवक तसलीमखाँ बिसमिल्लाखाँ, लाला डाबेराव, नासीरोद्दीन बद्रोद्दीन, आशिष बरे, संजय गुल्हाने, कृष्णराव गावंडे, दुर्गा अंभोरे, गुलाबसिंग सोळंके, डॉ. महेंद्र नवघरे, नंदकिशोर बबानिया, किशोर श्रीराव, शशीकांत खंडारे, मुन्ना नाईकनवरे, बालू टांक, गजानन टेवरे, राजू गुल्हाने, मुन्ना श्रीवास, जय ग्याने, नरेंद्र वानखडे, किशोर उघडे, सुशील जिरापुरे, समाजसेवक रवी राठी, किशोर सोनोने, सचिन गुल्हाने, सविनय गुल्हाने, अभिनव गुल्हाने, गणेश गुल्हाने आदी उपस्थित होते. संचालन कृष्णराव गावंडे यांनी, तर प्रास्ताविक नगरसेवक विनायक गुल्हाने व आभार शिवसेना तालुकाप्रमुख संगीत कांबे यांनी मानले.

Web Title: Bhumi Pujan of Social Hall at Hanuman Gymnasium