बीएचआर सोसायटीचे अध्यक्ष, संचालकांविरुध्द गुन्हा

By Admin | Updated: February 27, 2015 00:47 IST2015-02-27T00:47:33+5:302015-02-27T00:47:33+5:30

मालेगाव येथील प्रकरण, मुदत ठेव परत देण्यास टाळाटाळ भोवली.

BHR Society Chairman, crime against the directors | बीएचआर सोसायटीचे अध्यक्ष, संचालकांविरुध्द गुन्हा

बीएचआर सोसायटीचे अध्यक्ष, संचालकांविरुध्द गुन्हा

मालेगाव (जि. वाशिम) : येथील भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि. जळगावचे अध्यक्ष व संचालकाविरुध्द मालेगाव पोलीस स्टेशनमध्ये २५ फेब्रुवारीला गुन्हे दाखल करण्यात आले.
वाशिम येथील सिव्हील लाईन परिसरात राहणारे प्रकाश गोबरु राठोड यांनी मालेगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीत असे नमूद केले की, फियार्दीने भाईचंद हिराचंद रायसोनी को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि. जळगाव या पतसंस्थेच्या मालेगाव येथील शाखेत बचत खाते उघडून संजीवनी ठेव योजनेंतर्गत ३६५ दिवसांसाठी पाच लाख रुपये मुदत ठेव ठेवली होती. त्याची मुदत ३ जुलै २0१४ रोजी संपली. मुदत संपल्यानंतर ठेवीची रक्कम व्याजासह परत मागितली असता ती परत देण्यास पत संस्थेच्या कर्मचार्‍यांनी टाळाटाळ केली. त्यामुळे २५ फेब्रुवारीला प्रकाश राठोड यांनी बी.एच.आर चे संचालकांविरुध्द संगणमत करुन विश्‍वास घात करुन फसवणुक केल्याची फिर्याद दिली.
या फियार्दीवरुन पोलिसांनी संचालक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद रायसोनी, अध्यक्ष दिलीप कांतीलाल चोरडिया, उपाध्यक्ष मोतीलाल ओंकार जिरी, संचालक सुरजमल, भुरमल जैन, दादा रामचंद्र हरि पाटील, भागवत संपत माळी, राजाराम काशीनाथ कोळी, भागवत हिरामन वाघ, हितेंद्र महाजन, इंद्रकुमार लालवाणी, यशवंत ओंकार गिरी, शेख रमजान शेख अब्दुल नबी, सकुलाल सहादु माळी, माधवी कुलकर्णी, निलेश गावंडे यांच्याविरुद्ध भादंवि कलम ४0९, ४२0, १२0 ब (३),महाराष्ट्र ठेवीदार हितसंबध अधिनियम १९९९ नुसार गुन्ह्याची नोंद केली आहे. घटनेचा तपास ठाणेदार आर.एस.तट करीत आहेत.

Web Title: BHR Society Chairman, crime against the directors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.