भाऊसाहेबांची निवड; भाजपाचा जल्लोष!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2016 01:00 IST2016-07-09T01:00:42+5:302016-07-09T01:00:42+5:30
अकोल्यात फटाक्यांची आतषबाजी: पेढे वाटून आनंद साजरा.

भाऊसाहेबांची निवड; भाजपाचा जल्लोष!
अकोला: भाजपचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब फुंडकर यांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागून ते कॅबिनेट मंत्री झाल्याबद्दल भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी पक्ष कार्यालयासमोर व महापालिकेत प्रचंड जल्लोष केला. फटाक्यांची आतिषबाजी करीत पेढे वाटून कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. चांदेकर चौकातील भाजपच्या पक्ष कार्यालय परिसरात आमदार गोवर्धन शर्मा, महानगर अध्यक्ष किशोर मांगटे पाटील, महापौर उज्ज्वला देशमुख, डॉ. विनोद बोर्डे, धनंजय गिरीधर, डॉ. अशोक ओळंबे, माजी महापौर सुमन गावंडे, मनपा सभागृहनेत्या गीतांजली शेगोकार, सागर शेगोकार, चंदा शर्मा समवेत असंख्य कार्यकर्त्यांनी भर पावसात आतषबाजी व ढोलताशांच्या गजरात ना. फुंडकर यांच्या मंत्रिमंडळातील वर्णीचे स्वागत केले. यावेळी आ. शर्मा यांनी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये पेढे, मिठाईचे वाटप केले. भाऊसाहेबांची मंत्रिमंडळातील वर्णी ही विकासाची नवी पहाट असल्याचे मत आ. शर्मा यांनी व्यक्त केले.