आरोपींच्या शोधात भार्इंदर पोलीस अकोल्यात

By Admin | Updated: May 4, 2017 01:03 IST2017-05-04T01:03:16+5:302017-05-04T01:03:16+5:30

अकोला : बलात्कार प्रकरणातील आरोपी महिलांना शोधण्यासाठी ठाणे ग्रामीण अंतर्गत येणाऱ्या भार्इंदर पोलीस बुधवारी दुपारी अकोल्यात आले होते. त्यांनी शहरातील दोन महिलांचा शोध घेतला.

Bharinder police in Akolay in search of the accused | आरोपींच्या शोधात भार्इंदर पोलीस अकोल्यात

आरोपींच्या शोधात भार्इंदर पोलीस अकोल्यात

अकोला : बलात्कार प्रकरणातील आरोपी महिलांना शोधण्यासाठी ठाणे ग्रामीण अंतर्गत येणाऱ्या भार्इंदर पोलीस बुधवारी दुपारी अकोल्यात आले होते. त्यांनी शहरातील दोन महिलांचा शोध घेतला.
भार्इंदर येथे एका युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार तिच्यावर काही दिवसांपूर्वी लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. त्यानुसार भार्इंदर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. त्यातील दोन महिला आरोपी अकोल्याच्या आहेत. त्या अनेक दिवसांपासून फरार राहत असल्याने, पोलिसांना त्या अकोल्यात असल्याची माहिती मिळाल्याने भार्इंदर पोलीस बुधवारी अकोल्यात आले. पोलिसांनी पंचशील नगरात राहणारी आरती ऊर्फ भारती नरेश सोळंके आणि मूळची मध्य प्रदेशात राहणारी आणि सध्या जिल्ह्यातील हिवरगाव येथे मुक्कामी असलेली सुरेखा रमेश बसेर (४५) यांचा शोध घेतला. सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यातसुद्धा नोंद केली.

Web Title: Bharinder police in Akolay in search of the accused