भारिप-बमसंची उमेदवार यादी जाहीर
By Admin | Updated: September 20, 2014 23:33 IST2014-09-20T23:33:31+5:302014-09-20T23:33:31+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात भारिप-बमसंची उमेदवारी.

भारिप-बमसंची उमेदवार यादी जाहीर
बुलडाणा : विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया आज २0 सप्टेंबरपासून अधिकृत सुरू झाली असून, पहिल्याच दिवशी भारिप-बहुजन महासंघाने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. बुलडाण्यातील सातही मतदारसंघात पक्षाने उमेदवार दिले आहेत.
बुलडाणा मतदारसंघात अझहर खान, चिखलीमध्ये विजय खरात, सिंदखेडराजा मतदारसंघात दिलीप खरात, मेहकर मतदारसंघात प्रा. प्रकाश गवई, खामगाव मतदारसंघात अशोक सोनोने, जळगाव जामोद मतदारसंघात प्रसेनजित पाटील व मलकापुरात वसंतराव दांडगे हे उमेदवार असणार आहेत. या सातही मतदारसंघांपैकी गेल्यावेळी खामगाव व जळगाव जामोदमध्ये भारिपने जोरदार टक्कर दिली होती. यावेळी सर्वात आधी उमेदवार जाहीर करून भारिपने आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे पितृपक्षात कुठलाही राजकीय पक्ष उमेदवारी जाहीर करणार नाही, अशी शक्यता असतानाही भारिपने उमेदवार घोषित करून ही शक्यता मोडीत काढली आहे.