भाईचंद हिराचंद रायसोनी सहकारी पतसंस्थेच्या दे. राजा शाखेविरूद्ध गुन्हा
By Admin | Updated: July 21, 2016 01:00 IST2016-07-21T01:00:34+5:302016-07-21T01:00:34+5:30
देऊळगाव राजा शाखेतील फसवणूक व घोटाळा प्रकरण; तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे.

भाईचंद हिराचंद रायसोनी सहकारी पतसंस्थेच्या दे. राजा शाखेविरूद्ध गुन्हा
बुलडाणा : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी स्टेट सहकारी पतसंस्थेच्या देऊळगाव राजा शाखेतील फसवणूक व घोटाळ्यासंबंधी गुन्हा देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला विविध कलमान्वये दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सुरू आहे. भाईचंद हिरांचद रायसोनी मल्टी स्टेट सहकारी पतसंस्थेच्या दे.राजा शाखेंतर्गत कोणाचीही तक्रार असल्यास अशा तक्रारकर्त्यांनी त्यांच्या लेखी तक्रारी त्यांच्या जवळील नोटरीकडून साक्षांकित केलेल्या कागदपत्रांच्या पुराव्यासह कार्यालय गुन्हे अन्वेषण विभाग पथक, बुलडाणा कारागृहाजवळ, बुलडाणा येथे स्वत: आणून सादर कराव्यात, असे गुन्हे अन्वेषण विभागाकडून कळविण्यात आले आहे.