भगोरा गाव अजूनही रस्त्याच्या प्रतीक्षेत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:31 IST2021-05-05T04:31:03+5:302021-05-05T04:31:03+5:30
अनेक वर्षांपासून हा रस्ता खराब असल्याने या रस्त्यावरील रहदारी थांबली आहे, त्यामुळे गावकऱ्यांची खूपच पायपीट होत आहे. निवडणूक आली ...

भगोरा गाव अजूनही रस्त्याच्या प्रतीक्षेत!
अनेक वर्षांपासून हा रस्ता खराब असल्याने या रस्त्यावरील रहदारी थांबली आहे, त्यामुळे गावकऱ्यांची खूपच पायपीट होत आहे.
निवडणूक आली की उमेदवार फक्त आश्वासने देऊन जातात. निवडून आल्यावर ढुंकूनही पाहत नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. काही वर्षांपूर्वी भगोरा या गावाला आदर्श ग्राम पुरस्कार मिळाला होता परंतु आता या आदर्श ग्राम पुरस्कृत गावाची दुर्दशा होत आहे. तर तालुक्याचा कशा विकास होईल असा प्रश्न उपस्थित होतो. गावकऱ्यांनी या संदर्भात अनेकवेळा निवेदने व प्रस्ताव शासन दरबारी मांडले आहेत. तरी या गावाकडे लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. अनेक प्रस्ताव देऊनही कुठला अधिकारी या गावात फिरकला नसल्याने या गावाच्या नशिबी दुर्दैव आले आहे. जर रोड त्वरित झाला नाही तर उपोषणाचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
फोटो: मेल फाेटोत