रस्त्यावर फटाके विकल्यास खबरदार!

By Admin | Updated: October 21, 2014 00:29 IST2014-10-21T00:21:17+5:302014-10-21T00:29:40+5:30

अकोला महापालिकेचा व्यापा-यांना इशारा.

Beware if fireworks are sold on the street! | रस्त्यावर फटाके विकल्यास खबरदार!

रस्त्यावर फटाके विकल्यास खबरदार!

अकोला : दिवाळीनिमित्त रस्त्यांवर विनापरवानगी फटाके विकले जात असल्याचे वृत्त ह्यलोकमतह्णने प्रकाशित करताच, महापालिका प्रशासनाला खळबळून जाग आली. रस्त्यावर फटाके विक्री करणार्‍यांचे साहित्य जप्त करण्यासह दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने सोमवारी दिला.
दिवाळी सणानिमित्त फटाका विक्रेत्यांना अकोला क्रिकेट क्लब येथे फटाका विक्रीचा अधिकृत परवाना व जागा दिली जाते. असे असतानासुद्धा शहरातील मुख्य मार्गासह गल्लीबोळात ठिकठिकाणी फटाक्यांची बेकायदा विक्री होते. शहरातील मुख्य बाजारपेठसह रस्त्यांवर हातगाड्या तसेच चक्क पलंगावर फटाका विक्रीचे स्टॉल थाटले जातात. गर्दीच्या ठिकाणी अचानक दुर्घटना घडल्यास अशा दुकानांमुळे मोठी हानी होण्याची दाट शक्यता राहते. शिवाय अशा ठिकाणी अग्निशमन यंत्रणेला विलंब होऊ शकतो. यासंदर्भात ह्यलोकम तह्णने लिखाण केल्यानंतर मनपा प्रशासनाला जाग आली आहे. रस्त्यांवर तसेच शहरात इतर ठिकाणी फटाका विक्री करणार्‍यांचे साहित्य जप्त करण्यासह दंडात्मक कारवाई व वेळ प्रसंगी फौजदारी करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

 

Web Title: Beware if fireworks are sold on the street!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.