अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी ‘एमपीजे’चे धरणे

By Admin | Updated: August 1, 2015 00:28 IST2015-08-01T00:28:20+5:302015-08-01T00:28:20+5:30

अनेक विद्यार्थ्यांना वर्ष २00९ पासून शिष्यवृत्तीची रक्कम मिळालेली नाही.

For the benefit of minority students' scholarship 'MPJ' | अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी ‘एमपीजे’चे धरणे

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी ‘एमपीजे’चे धरणे

अकोला : राज्यात अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजना सुरू आहेत. परंतु, अनेक विद्यार्थ्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. वंचित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून द्यावा, या मागणीसाठी 'मुव्हमेंट फॉर पिस अँन्ड जस्टीस'(एम.पी.जे.) या सामाजिक संघटनेच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
राज्यात अल्पसंख्याक विद्यार्थ्यांंना दहावीपूर्व शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे; परंतु त्यापैकी अनेक विद्यार्थ्यांना वर्ष २00९ पासून शिष्यवृत्तीची रक्कम मिळालेली नाही. शिष्यवृत्तीचे कोट्यवधी रुपये शिक्षण संचालक, माध्यमिक, पुणे यांच्या खात्यात जमा आहेत; परंतु विद्यार्थ्यांंपर्यंंत ही रक्कम पोहोचली नाही. माहिती अधिकार कायद्यांतर्गत शासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार अल्पसंख्याक विद्यार्थ्यांंच्या शिष्यवृत्तीसाठी आलेले एकूण १७३ कोटी ९५ लाख ९४ हजार २१९ रुपये जमा आहेत. परंतु गरजू विद्यार्थ्यांंना त्याचा काहीही फायदा मिळालेला नाही. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांंना तातडीने शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Web Title: For the benefit of minority students' scholarship 'MPJ'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.