लसीच्या दुसऱ्या डोजची लाभार्थ्यांमध्ये आतुरतेने प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:18 IST2021-02-13T04:18:26+5:302021-02-13T04:18:26+5:30

लसीकरणानंतरची लक्षणे सकारात्मक लस घेतल्यानंतर अनेकांना डोकेदुखी, थंडी वाजून ताप येणे, अंगदुखी यासारखी लक्षणे आढळून आल्याने लाभार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण ...

Beneficiaries eagerly await the second dose of the vaccine | लसीच्या दुसऱ्या डोजची लाभार्थ्यांमध्ये आतुरतेने प्रतीक्षा

लसीच्या दुसऱ्या डोजची लाभार्थ्यांमध्ये आतुरतेने प्रतीक्षा

लसीकरणानंतरची लक्षणे सकारात्मक

लस घेतल्यानंतर अनेकांना डोकेदुखी, थंडी वाजून ताप येणे, अंगदुखी यासारखी लक्षणे आढळून आल्याने लाभार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. ही लक्षणे सकारात्मक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कुठलीही लस घेतल्यानंतर शरीर त्यावर प्रतिक्रिया देते, तशीच प्रतिक्रिया कोविड लस घेतल्यानंतर शरीर देत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मत आहे. लस घेतल्यानंतर शरीर त्यावर प्रतिकार करते, म्हणजेच शरीरातील प्रतिकार शक्ती ॲक्टिव्ह होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

लस घेतली त्या दिवशी रात्री उशिरा थकवा जाणवला, पण ही परिस्थिती दिवसभरात केलेल्या कामामुळे देखील निर्माण होऊ शकते. त्यानंतर मात्र कुठलाच त्रास झाला नाही. मी स्वत: इतरांना लस घेण्यासाठी प्रेरित करतो. समोर या, लस घ्या, ही लस कोविड योद्ध्यांसाठीच तयार केली असून, माझे लसीकरण हे कोविडविरुद्धच्या लढ्यात जीव गमावलेल्या प्रत्येक कोविड योद्ध्याला समर्पित करतो. लस पूर्णत: सुरक्षित आहे.

डॉ. आशिष गिऱ्हे, हॉस्पिटल मॅनेजर, अकोला

Web Title: Beneficiaries eagerly await the second dose of the vaccine