बळीराजा, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष एकवटले!

By Admin | Updated: April 12, 2016 01:55 IST2016-04-12T01:55:13+5:302016-04-12T01:55:13+5:30

प्रश्न शेतक-यांचे; न्याय हक्कासाठी सर्वच आक्रमक, प्रशासनाला दिले निवेदन.

Beggars, social organizations, gathered political parties! | बळीराजा, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष एकवटले!

बळीराजा, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष एकवटले!

अकोला: शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांवर राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, स्वत: शेतकरी सोमवारी एकवटले. शेतकर्‍यांचे प्रश्न मार्गी लागवण्यासाठी सातही तालुक्यात शासकीय अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोठय़ा संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते. बळीराजासाठी समाजातील विविध घटकांनी एकाच वेळी आंदोलनाचा बिगुल वाजविल्याने प्रशासन हादरले आहे. एकीकडे निसर्गाच्या लहरीणपणामुळे उत्पादन घटत असून, दुसरीकडे शासकीय अधिकार्‍यांच्या अनास्थेमुळे शेतकर्‍यांपर्यंत शासकीय योजना पोहोचत नाहीत. परिणामी शेतकर्‍यांवरील कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढतच आहे. संसाराचा गाडा कसा ओढावा व येत्या खरीप हंगामातील पिकांचे नियोजन कसे करावे, असे एक ना अनेक प्रश्न शेतकर्‍यांना पडले आहेत.

Web Title: Beggars, social organizations, gathered political parties!