जुन्या वादातून मारहाण; दोघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:35 IST2020-12-15T04:35:44+5:302020-12-15T04:35:44+5:30
मूर्तिजापूर : तालुक्यातील मुरंबा येथे पूर्व वैमनस्यातून वाद घालून काठीने व विळ्याने मारहाण करून बापलेकाना जखमी केल्याची घटना १४ ...

जुन्या वादातून मारहाण; दोघे जखमी
मूर्तिजापूर : तालुक्यातील मुरंबा येथे पूर्व वैमनस्यातून वाद घालून काठीने व विळ्याने मारहाण करून बापलेकाना जखमी केल्याची घटना १४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली.
ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम मुरंबा येथील अनिल श्यामराव शिंदे हे मजुरीचे काम आटोपून घरी परत येत असताना गावातील रामराव कडतकर याने पूर्व वैमनस्यातून वाद घालून शिवीगाळ केली तसेच काठीने मारहाण व पाठीत विळ्याने वार करून गंभीर जखमी केले. मुलगा अनिल शिंदे यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिसांनी आरोपी रामराव कडतकर यांच्याविरुद्ध ३२४, ५०४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल रामेश्वर घोंगे, पोलीस शिपाई विनोद राठोड करीत आहेत.