लसीकरण केंद्रावर कर्मचाऱ्याला मारहाण; लसीकरण बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:14 IST2021-06-01T04:14:50+5:302021-06-01T04:14:50+5:30

सकाळी लसीकरणाचा कार्यक्रम सुरळीत सुरू असताना शहर काँग्रेसचा अध्यक्ष दिनेश दुबे आपल्या सहकाऱ्यांसह तेथे पोहोचला. लसीकरणाच्या कारणावरून उपस्थित डॉ. ...

Beating of an employee at a vaccination center; Vaccination stopped! | लसीकरण केंद्रावर कर्मचाऱ्याला मारहाण; लसीकरण बंद!

लसीकरण केंद्रावर कर्मचाऱ्याला मारहाण; लसीकरण बंद!

सकाळी लसीकरणाचा कार्यक्रम सुरळीत सुरू असताना शहर काँग्रेसचा अध्यक्ष दिनेश दुबे आपल्या सहकाऱ्यांसह तेथे पोहोचला. लसीकरणाच्या कारणावरून उपस्थित डॉ. हेमंत तायडे यांना आरोपींनी मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. यामुळे लसीकरण ठप्प झाले, तर पोलिसांनी राडा करणाऱ्या प्रेम दुबे, सागर दुबे या आरोपींना अटक केली असून, तिसरा आरोपी काँग्रेसचा शहराध्यक्ष दिनेश दुबे फरार झाला आहे. दिनेश दुबे हा गुंड प्रवृत्तीचा असल्याने त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. गत वर्षांपूर्वी त्याला तडीपार करण्यात आले होते. पालिका आवारात लसीकरण केंद्रावर सोमवारी सकाळी ११ वाजता लसीकरणाला सुरुवात झाली.

कोविशिल्डचा दुसरा डोस देण्याची प्रक्रिया यंत्रणेने सुरू केली, कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस देण्याची प्रक्रिया सुरू करताच, प्रेम दुबे व सागर दुबे यांनी नोंदणी करणारे हेमंत तायडे यांच्याशी वाद घातला. नोंदणी करताना संबंधितास रांगेतील मागच्या व पुढच्या व्यक्तीविषयी का विचारता? असा सवाल उपस्थित करून अश्लील शिवीगाळ केली. उपस्थित नागरिकांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने लसीकरण केंद्रात दाखल झालेल्या दिनेश दुबे याने हेमंत तायडे यांना मारहाण केली.

हा प्रकार उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांना कळताच त्यांनी पोलीस निरीक्षकांशी संपर्क साधून याप्रकरणी तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले. डॉ. विजय पांडुरंग वाडेकर यांच्या तक्रारीनुसार शहर पोलिसांनी प्रेम दुबे, सागर दुबे, दिनेश दुबे या तिघांविरुद्ध भादंवि कलम ३५३, ३३२, २९४, ५०४, ५०६,३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. प्रेम व सागर दुबे यांना अटक केली.

Web Title: Beating of an employee at a vaccination center; Vaccination stopped!