गौरक्षण नव्हे बाजार रोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:20 IST2021-02-11T04:20:44+5:302021-02-11T04:20:44+5:30

काैलखेड चाैकात अतिक्रमण वाढले अकाेला : बार्शी टाकळी राेडवरील काैलखेड चाैकात माेठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण हाेत ...

Bazaar Road, not Gaurakshan | गौरक्षण नव्हे बाजार रोड

गौरक्षण नव्हे बाजार रोड

काैलखेड चाैकात अतिक्रमण वाढले

अकाेला : बार्शी टाकळी राेडवरील काैलखेड चाैकात माेठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण हाेत आहे. मनपाच्या अतिक्रमण विभागाने या परिसरातील अतिक्रमण काढावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

आकाेट फैलमध्ये दारूची अवैध विक्री

अकाेला : आकाेट फैल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध भागात अवैध दारू विक्री जाेरात सुरू आहे. याकडे पाेलिसांचे दुर्लक्ष हाेत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विशेष पथक तसेच शहर पाेलीस उपअधीक्षक यांच्या पथकाकडून या ठिकाणच्या दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे.

रस्त्यामुळे नागरिक हैराण

अकाेला : आकाेट फैल बापूनगर ते दम्मानी नेत्र हाॅस्पिटलपर्यंत रस्ता खाेदण्यात आला असून, कच्चा माल यावर टाकण्यात आला आहे. या रस्त्याचे काम अर्धवट असल्याने वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे कामकाज तातडीने करावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

राेहित्र धाेकादायक

अकाेला : शहराच्या विविध भागात लावण्यात आलेले विजेचे राेहित्र उघड्यावर असल्याने ते धाेकादायक ठरत असल्याचे चित्र आहे. राेहित्रापासून धाेका हाेऊ नये म्हणूण संरक्षणासाठी पेटी लावण्यात आली हाेती. मात्र या पेट्यांची झाकन चाेरीला गेल्याने हे राेहित्र पुन्हा उघडे झाले असून, त्यापासून धाेका निर्माण झाला आहे.

Web Title: Bazaar Road, not Gaurakshan