शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेच्या रणनितीसाठी बावनकुळे गुरुवारी अकाेल्यात, मतदार संघनिहाय आढावा बैठकांचे सत्र

By आशीष गावंडे | Updated: September 11, 2024 21:08 IST

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून आगामी नाेव्हेंबर महिन्यात निवडणूक हाेण्याचे संकेत आहेत.

अकाेला: आगामी विधानसभा निवडणुकीची रणनिती आखण्याच्या उद्देशातून भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाेबत संवाद साधण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे गुरुवार १२ सप्टेंबर राेजी अकाेल्यात दाखल हाेणार आहेत. यादरम्यान, ते विधानसभा मतदार संघनिहाय आढावा बैठका घेणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून आगामी नाेव्हेंबर महिन्यात निवडणूक हाेण्याचे संकेत आहेत. लाेकसभा निवडणुकीतील अनुभवानंतर भाजपने सर्वेच्या माध्यमातून राज्यात विधानसभेच्या २८८ जागांची चाचपणी करुन सर्वेचा अहवाल केंद्रिय व प्रदेश कार्यकारिणीकडे सादर केल्याची माहिती आहे. केंद्रिय स्तरावरुन प्राप्त सुचनेनुसार भाजपची राज्यातील यंत्रणा कामाला लागली असून महाराष्ट्रासाठी नियुक्त केलेल्या केंद्रिय प्रभारींचे मागील काही दिवसांपासून अकाेल्यात दाैरे वाढले आहेत. त्याच धर्तीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे १२ सप्टेंबर राेजी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघनिहाय आढावा घेण्यासाठी दाखल हाेत आहेत. पदाधिकारी,कार्यकर्त्यांसाेबत थेट संवाद -प्रदेशाध्यक्ष बावनकुळे पक्ष संघटन, बुथ प्रमुखांपासून ते पन्ना प्रमुखांच्या संदर्भात पक्षाचे स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांसाेबत सविस्तर चर्चा करणार आहेत. सुरुवातीला मुर्तिजापूर त्यानंतर अकाेट येथील बैठकीत संवाद साधल्यानंतर शहरालगतच्या रिधोरा येथे अकोला पूर्व व अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. त्यानंतर सायंकाळी पारस येथे बाळापूर विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांसाेबत चर्चा करतील.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपाvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024