बॅटरी लंपास करणारी टोळी गजाआड

By Admin | Updated: June 24, 2017 05:45 IST2017-06-24T05:45:26+5:302017-06-24T05:45:26+5:30

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: तिघांना रविवारपर्यंंत पोलीस कोठडी.

Battery lounging gang | बॅटरी लंपास करणारी टोळी गजाआड

बॅटरी लंपास करणारी टोळी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : वाहनांच्या बॅटरी लंपास करणार्‍या टोळीला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. टोळीतील तिघा आरोपींना शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना २५ जूनपर्यंंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
एमआयडीसी परिसरातील राजू पाटील यांच्या शेतातील ट्रॅक्टरची बॅटरी आणि काही अवजारे चोरीस गेल्याची घटना १८ जून रोजी रात्री घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांकडे देण्यात आला. पोलिसांनी तपास करून बाभूळगाव जहागीर येथील प्रमोद ऊर्फ धम्मा विशाल सिरसाट (३0), उमेश रमेश सिरसाट (२८), राजेश ब्रिजलाल सिरसाट (२७) यांना गुरुवारी रात्री अटक केली. त्यांच्याकडून बॅटरी व अवजारे जप्त करण्यात आले. ही टोळी जिल्हय़ात फिरून वाहनांच्या बॅटरी लंपास करीत असल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली. या टोळीमध्ये आणखी काही आरोपी सहभागी असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींना २५ जूनपर्यंंंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय ठाकूर, शेरअली, अमित दुबे, संदीप काटकर यांनी केली.

Web Title: Battery lounging gang