शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

४ आॅक्टोबरपर्यंतच्या पटसंख्येच्या आधारावर संचमान्यता होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 13:52 IST

यंदा ४ आॅक्टोबरपर्यंतची स्टुटंड पोर्टलवरील पटसंख्या विचारात घेऊन संचमान्यता करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे संचमान्यतेची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया राबविण्यात येते. ही आॅनलाइन माहिती दिल्यामुळे एकूणच शाळांमधील स्थिती लक्षात येणार आहे. विद्यार्थी संख्येनुसार शाळांमधील शिक्षकांची संख्या लक्षात येईल.

अकोला : २0१८-१९ वर्षाच्या संचमान्यतेसाठी सर्व माध्यमांच्या शाळांमधील पटसंख्या स्टुडंट पोर्टलवर टाकावी लागते. यंदा ४ आॅक्टोबरपर्यंतची स्टुटंड पोर्टलवरील पटसंख्या विचारात घेऊन संचमान्यता करण्यात येणार आहे.शाळांची संचमान्यतेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थी पटसंख्या, अतिरिक्त शिक्षक, विषयनिहाय पदे आणि रिक्त पदे आदी माहिती लक्षात येते. संचमान्यतेची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया राबविण्यात येते. ही आॅनलाइन माहिती दिल्यामुळे एकूणच शाळांमधील स्थिती लक्षात येणार आहे. विद्यार्थी संख्येनुसार शाळांमधील शिक्षकांची संख्या लक्षात येईल. त्यावरून अतिरिक्त शिक्षक, शाळेतील रिक्त पदांची संख्या समोर येईल. या दृष्टिकोनातून महत्त्वाची असणारी २0१८-१९ ची संचमान्यता ही ३0 सप्टेंबरपर्यंत स्टुडंड पोर्टलवर आॅनलाइन टाकण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारे करण्यात येणार होती; परंतु तांत्रिक अडचणींमुळे ही संचमान्यता आता ३0 सप्टेंबरऐवजी ४ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजतापर्यंत स्टुटंड पोर्टलवरील विद्यार्थी पटसंख्येच्या आधारे करण्यात येणार आहे. त्यानंतर आॅनलाइन टाकण्यात आलेली विद्यार्थ्यांची पटसंख्या गृहीत धरल्या जाणार नाही. संचमान्यतेच्या कामासाठी वेळापत्रकसुद्धा देण्यात आले आहे. शाळा लॉगिनमधून केंद्रप्रमुख लॉगिनला विद्यार्थ्यांची माहिती ४ ते १५ आॅक्टोबरपर्यंत द्यावी लागणार आहे, तसेच केंद्रप्रमुख लॉगिनमधून शाळेने पाठविलेली विद्यार्थ्यांची माहिती ४ ते १८ आॅक्टोबरपर्यंत अंतिम करण्यासाठी मुदत दिली आहे. (प्रतिनिधी) आॅनलाइन टाकण्यात आलेली विद्यार्थी पटसंख्येची माहिती ही ४ आॅक्टोबरपर्यंत गृहीत धरण्यात येईल. त्यापुढील पटसंख्या संचमान्यतेसाठी लक्षात घेतली जाणार नाही. विद्यार्थी संख्येनुसार शाळांमधील शिक्षकांची संख्या लक्षात येईल.- प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी,माध्यमिक जि.प. अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्रTeacherशिक्षकSchoolशाळा