शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

बार्शीटाकळी पंचायत समितीच्या लाचखोर गटविकास अधिकाऱ्यासह कनिष्ठ सहायक अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 10:24 IST

१५ हजार रुपयांची लाच मागितल्याने या दोन्ही लाचखोरांना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १५ हजारांची लाच स्वीकारताना गुरुवारी सायंकाळी रंगेहाथ अटक केली.

अकोला : बार्शीटाकळी पंचायत समितीचा प्रभारी गटविकास अधिकारी गोपाल राजाराम बोंडे व कनिष्ठ सहायक अनंत तुळशीराम राठोड या दोघांनी तक्रारदाराच्या रजा मंजूर करून त्याचे देयक काढण्यासाठी तब्बल १५ हजार रुपयांची लाच मागितल्याने या दोन्ही लाचखोरांना अकोलालाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १५ हजारांची लाच स्वीकारताना गुरुवारी सायंकाळी रंगेहाथ अटक केली. या दोघांनी तक्रारदाराच्या अकोला येथील खेतान नगरमधील घरी जाऊन लाच स्वीकारल्याची माहिती समोर आली आहे.बार्शीटाकळी पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या तसेच न्यू खेतान नगरमधील प्राजक्ता कन्या शाळेजवळील रहिवासी ५० वर्षीय तक्रारदाराच्या रजेच्या कालावधीमधील रजा मंजूर करून त्याचे देयक मंजूर करण्याकरिता बार्शीटाकळी पंचायत समितीचा प्रभारी गटविकास अधिकारी गोपाल राजाराम बोंडे रा. सहकार नगर अकोला व कनिष्ठ सहायक अनंत तुळशीराम राठोड रा. दगडपारवा ता. बार्शीटाकळी या दोघांनी १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली; मात्र तक्रारकर्त्यास लाच देणे नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. यावरून अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १९ जून रोजी पडताळणी केली असता, या दोघांनीही १५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले. त्यानंतर तब्बल चार महिन्यांनी या दोघांनी तक्रारदाराच्या न्यू खेतान नगरातील निवासस्थानी गुरुवारी १५ हजार रुपयांची लाच घेताना सापळा रचून असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख शरद मेमाने व त्यांच्या पथकाने दोन्ही लाचखोर आरोपींना अटक केली. त्यानंतर या दोन्ही लाचखोरांविरुद्ध खदान तसेच बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस उप-अधीक्षक शरद मेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल इंगळे, प्रदीप गावंडे, सुनील येलोने, सलीम खान व इम्रान यांनी केली. शासकीय कार्यालय लाचखोरांचा अड्डाबार्शीटाकळी तालुक्यातील पंचायत समिती तसेच शिक्षण विभाग यासह कृषी विभाग व भूमी अभिलेख विभाग सध्या लाचखोरांचा अड्डा बनला आहे. या ठिकाणच्या तक्रारी वारंवार करण्यात येत आहेत; मात्र भूमी अभिलेख विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथील लाचखोरांची पाठराखण सुरू केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. प्रत्येक टेबलवर ५०० तसेच हजार रुपयांची मागणी या कार्यालयामध्ये करण्यात येत असल्याचीही माहिती आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागBarshitakliबार्शिटाकळी