बार्शीटाकळी: विनामास्क फिरणाऱ्या १७ जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:18 IST2021-05-19T04:18:46+5:302021-05-19T04:18:46+5:30

शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून, दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ...

Barshitakali: Action taken against 17 people walking around without masks | बार्शीटाकळी: विनामास्क फिरणाऱ्या १७ जणांवर कारवाई

बार्शीटाकळी: विनामास्क फिरणाऱ्या १७ जणांवर कारवाई

शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून, दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. असे असतानाही काही नागरिक बेफिकीर असल्याचे दिसून येत आहे. अनेक जण विनामास्क बिनधास्त फिरत असल्याचे दिसून येत आहे. यावर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली अकोल्यातील अनधिकृत वाहतूक विभागाने १२ जणांवर मास्क न घालणे व ५ लोकांवर संचारबंदीचे नियम मोडणे, असे एकून १७ लोकांवर कलम १८ ष अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस हेडकॉन्स्टेबल शरद सांगले, पोलीस कॉन्स्टेबल अनुराधा महाले, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप जाधव, पोलीस कॉन्स्टेबल बद्रीनाथ पुरी, होमगार्ड स्वाती वाहुरवाघ यांनी केली. (फोटो)

Web Title: Barshitakali: Action taken against 17 people walking around without masks