चिंब पावसात बाप्पाचे आगमन
By Admin | Updated: August 30, 2014 01:37 IST2014-08-30T01:34:15+5:302014-08-30T01:37:51+5:30
अकोल्यात रिमझीम पावसात गणेशाचे आगमन

चिंब पावसात बाप्पाचे आगमन
अकोला : आकाशातून बरसत असलेला रिमझिम पाऊस, दिंडी, डिजे, ढोल- ताशांच्या गजरात जिल्हाभरात वाजत गाजत श्री गणरायाचे आगमन झाले. शहरात सकाळी ९ वाजतापासून तर दुपारी २.३0 वाजेपर्यंंत रिमझिम पाऊस सुरू होता. मात्र, या पावसातही भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. शुक्रवारी लाडके बाप्पा वाजत-गाजत घरोघरी विराजमान झाले. शहरातील प्रमुख मार्गांंसह अनेक भागात गणेश मूर्तीची उत्साहात मिरवणूक काढण्यात आली.
संपूर्ण राज्यभरात साजरा होणारा व युवकांच्या उत्साहाला उधाण आणणार्या गणेशोत्सवाला शुक्रवारपासून सुरुवात झाली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह घराघरांत बाप्पा विराजमान झाले. गणेशमूर्ती खरेदी करण्यासाठी भक्तांनी अकोला क्रिकेट क्लब, तापडियानगरातील भारत विद्यालयाजवळील मैदान, जय हिंद चौक, कौलखेड चौकात गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंंत भाविक वाजत-गाजत गणेश मूर्ती घेऊन जात होते. गणेश मूर्तीसोबतच पूजेचे साहित्य, सजावटीचे साहित्य व इतर पूरक साहित्याची खरेदी करण्यासाठी बाजारपेठा गजबजून गेल्या होत्या. शहरातील गणेश मंडळे, घराघरांतील सदस्य, चिमुकले सायकलरिक्षा, ऑटोरिक्षा, कार, ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाडी तसेच सायकलवर वाजत-गाजत बाप्पांना घेऊन जात होते. गणरायाचा जयघोष आणि गुलाल, फुलांची उधळण करीत सार्वजनिक गणेश मंडळांनी मिरवणूक काढली. सार्वजनिक गणेश मंडळांनी काढलेली गणरायाची मिरवणूक रात्री उशिरापर्यंंत सुरू होती. गणेश स्थापनेचा मुहूर्त दुपारी २.३0 वाजेपर्यंंत असल्यामुळे अनेक घरगुती गणेशाची सकाळीच स्थापना करण्यात आली.
*बँड, दिंडी, ताशांच्या भावात वाढ
गणेश स्थापनेच्या मिरवणुकीत मोठय़ा प्रमाणात दिंडी, ढोल ताशांचा उपयोग केल्या जातो. गणरायाची मिरवणूक वाजत-गाजत काढण्यात येते. एका दिवसात वाजंत्री मंडळींना बरीच मागणी असते. महिनाभरापासून बॅन्ड पथक, बॅन्जो पार्टी, सनई-चौघडा वाजविणार्यांची गणेश मंडळांनी बुकिंग केलेली असते. मात्र काही मंडळे वेळेवर बॅन्ड पार्टी, ढोल-तासे सांगतात. यावेळी वाजंत्रीच्या भावात प्रचंड वाढ झाल्याचे निदर्शनास आले. दोन ते तीन तास वाजविण्याचे पाच ते दहा हजार रुपयांपर्यंत भाव वाढले होते.
*मातीच्या मूर्तींचा तुटवडा,
प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तींच खरेदी
बाजारामध्ये मातीच्या मूर्तींच उपलब्ध नाहीत. काही दुकानांमध्ये मातीची मूर्ती मिळेल, असे फलक लावण्यात आले आहे. मात्र, त्या मूर्ती मातीच्याच आहेत, याची विश्वसनीयता नाही. त्यामुळे ग्राहकांनी प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तींंंनाच पसंती दिली. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जावा, यासाठी मोठय़ा प्रमाणात जनजागृती करण्यात आली. तरीदेखील गणेश भक्तांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींच खरेदी केल्या.