बंदी असलेल्या चायनीज फटाक्यांची सर्रास विक्री!
By Admin | Updated: October 19, 2014 01:01 IST2014-10-19T01:01:49+5:302014-10-19T01:01:49+5:30
अकोला येथे घातक फटाके विक्रीस;फटाक्यांमुळे होतात असाध्य आजार.

बंदी असलेल्या चायनीज फटाक्यांची सर्रास विक्री!
विवेक चांदूरकर /अकोला
देशात विक्रीवर बंदी असल्यानंतरही बाजारपेठेत चायनीज फटाक्यांची राजरोस विक्री होत आहे. चीनमध्ये बनविण्यात आलेले फटाके घातक असून, यापासून अंधत्व येण्याची दाट शक्यता असून या फटाक्याून निघणार्या धुरापासून गंभीर आजार जडण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केली आहे.
चीनमध्ये बनविलेल्या फटाक्यांवर भारतीय बाजारात पूर्ण बंदी असल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच जाहीर केले; मात्र, त्यानंतरही अकोल्यातील बाजारपेठेत चायनीज फटाक्यांची सर्रास विक्री होत आहे. महानगर पालिकेने फटाक्यांची विक्री करण्यासाठी अकोला क्रिकेट क्लबची जागा अधिकृतरीत्या दिली आहे. त्यानंतरही शहरातील गांधी चौकात फटाक्यांची अनेक दुकाने लागली आहेत. या दुकानांमध्ये चिनी फटाक्यांची विक्री होत आहे. चीनमध्ये बनलेल्या बंदुका व त्यातील गोळ्या मिळत आहेत. तसेच काही दुकानांमध्ये प्रसिद्ध असा ह्यपटकबॉम्बह्णही मिळत आहे. बाजारपेठेत शिवाकाशी येथे बनलेल्या फटाक्यांची विक्री मोठय़ा प्रमाणात होत आहे; मात्र त्यासोबतच चायनीज फटाक्यांची विक्री होत आहे. मनपाने तंबी दिल्यामुळे अकोला क्रिकेट क्लबमध्ये असलेल्या दुकानांमध्ये चायनीज फटाक्यांची विक्री होता दिसत नाही. मात्र, शहरातील अन्य बाजारपेठेत चायनीज फटाक्यांची विक्री होत आहे.