बँकांनी अवैध बांधकाम व अतिक्रमकांना कर्ज देऊ नये

By Admin | Updated: March 14, 2016 01:20 IST2016-03-14T01:20:06+5:302016-03-14T01:20:06+5:30

अकोला मनपात झालेल्या बँकर्स कार्यशाळेत आयुक्तांचे अवाहन.

Banks should not allow illegal constructions and loans to the encroachers | बँकांनी अवैध बांधकाम व अतिक्रमकांना कर्ज देऊ नये

बँकांनी अवैध बांधकाम व अतिक्रमकांना कर्ज देऊ नये

अकोला: राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानातील पात्र व्यक्ती व गटांना व्यवसायासाठी बँकेने कर्ज देताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे तपासून गरजूंना आर्थिक पाठबळ द्या; मात्र शहरात अवैध बांधकाम व अतिक्रमण करणार्‍या उद्योजक वा बांधकाम व्यावसायिकांना वित्त पुरवठा करून नागरिकांच्या फसवणुकीतील भागीदार होऊ नका, असे विनंतीवजा आवाहन महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी केले.
राष्ट्रीय नागरी उपजीविका (एनयूएलएम) अभियानातील संसाधन संस्था महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या माध्यमातून मनपाच्या सभागृहात आयोजित बँकर्स कार्यशाळेत ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. कार्यशाळेचे उद्घाटन उपमहापौर विनोद मापारी यांच्या हस्ते झाले.
यावेळी जिल्हा अग्रणी बँक सेन्ट्रल बँक इंडियाचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. उपमहापौर विनोद मापारी यांनी बँकांनी गरजूंविषयी सकारात्मक भूमिका ठेवण्याचे आवाहन केले.
मनपाचे सामाजिक विकास व संस्थात्मक बांधणी व्यवस्थापक संजय राजनकर यांनी अभियानातील विविध घटकांची माहिती देताना शहरी गरिबांसाठी असलेल्या
विविध उपक्रमांचे सादरीकरण केले.

Web Title: Banks should not allow illegal constructions and loans to the encroachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.