बँक फोडण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: October 2, 2014 01:49 IST2014-10-02T01:49:55+5:302014-10-02T01:49:55+5:30
अकोला येथील बँक ऑफ इंडियाची शाखा फोडण्याचा प्रयत्न.

बँक फोडण्याचा प्रयत्न
अकोला : बिर्ला रोडवरील शुभमंगल कार्यालयात असलेली बँक ऑफ इंडियाची शाखा फोडण्याचा प्रयत्न चोरट्याने केला; परंतु सुदैवाने चोरट्याच्या हाती काही न सापडल्याने त्याला खाली हात परतावे लागले. ही घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. बँक ऑफ इंडिया शाखा बिर्ला रोड येथील व्यवस्थापक देवीदास नारायण शिगोलकर (५७) यांच्या तक्रारीनुसार, ३0 सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने बँकेच्या इमारतीतील खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून आत प्रवेश केला आणि बँकेतील एका टेबलमधील कपाट उघडले. त्यात काहीच नसल्याने चोरट्याने बँकेतील एटीएम मशीनकडे मोर्चा वळवून एटीएम मशिनच्या खालील दार उघडण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याचा प्रयत्न व्यर्थ ठरला. बुधवारी सकाळी १0 वाजताच्या सुमारास बँक उघडल्यावर चोरीचा प्रयत्न झाल्याचे लक्षात आले. शिगोलकर यांच्या तक्रारीनुसार, रामदासपेठ पोलिसांनी चोरट्याविरुद्ध भादंवि कलम ४५७, ५८0, ५११ नुसार गुन्हा दाखल केला.