शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

‘कनेक्टिव्हिटी’अभावी बँक व्यवहार ठप्प

By admin | Updated: August 10, 2014 20:58 IST

एटीएम बंद, नागरिकांना हेलपाटे

अकोला - इंटरनेट कनेक्टिव्हिटीमध्ये आलेल्या अडचणींमुळे बँकांचे व्यवहार शनिवारी मोठय़ाप्रमाणावर प्रभावित झालेत. राष्ट्रीयीकृत बँकांसह मध्यवर्ती बँकेच्या अनेक शाखांमधील कोट्यवधी रुपयांचे व्यवहार त्यामुळे ठप्प पडले होते. एचडीएफसी, बँक ऑफ इंडिया आणि अँक्सीस या तीन बँकांचे एटीएम वगळता शहरातील बहुंतांश बँकांचे एटीएम बंद होते. रक्षाबंधन उत्सवाच्या पूर्वसंध्येला बँकांचे व्यवहार बंद पडल्याने नागरिकांना रोख रकम काढण्यासाठी भटकावे लागले. शनिवारी अर्धा दिवस सुटी तसेच रविवारी सुटी सोबतच रक्षाबंधन असल्याने बँकांमध्ये व्यवहार करण्यासाठी नागरिकांची नेहमीपेक्षा अधिक गर्दी होती. एकीकडे बँकांमध्ये खातेदारांची गर्दी असताना दुसरीकडे बहुतांश राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखांमध्ये नेट कनेक्टिव्हिटी नसल्याने व्यवहार बंद पडले होते. त्यामुळे बँकेत रोख जमा करणे, रोख काढणे, ट्रान्सफर करण्यासह इतर सर्वच व्यवहार बंद ठप्प झाले होते. विद्युत पुरवठा खंडित असणे किंवा इतर तांत्रिक अडचणींमुळे कनेक्टिव्हिटीच्या अडचणी नेहमीच उद्भवतात; मात्र शनिवारी बँकांमध्ये अर्धा दिवसांचे कामकाज असताना नेमके त्याच वेळेत इंटरनेट सेवा खंडित झाल्यामुळे संगणकावरील कामकाज बंद पडले. बँकांमधील व्यवहार बंद असल्याने त्याचा परिणाम नेटवर्कने जोडलेल्या एटीएमवरही झाला. एटीएममधूनही व्यवहार होत नसल्याने नागरिकांना मन:स्थाप सहन करावा लागला. शहरातील बहुतांश बँकांचे एटीएम बंद असल्याने नागरिकांना रोख काढण्यासाठी भटकावे लागले

** या बँकेतील कनेक्टिव्हिटी गायब दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ग्रामीण भागातील अनेक शाखा, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, युको बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या काही शाखा, आयसीआयसीआय बँक, आयडीबीआय बँक, स्टेट बँक ऑफ हैदराबाद यासह स्टेट बँक ऑफ इंडियाच्या काही शाखांमध्ये नेट कनेक्टिव्हिटी नसल्याची माहिती बँकेच्या अधिकार्‍यांनी दिली. विद्युत पुरवठा खंडित किंवा वादळी वार्‍यामुळे कनेक्टिव्हिटी गायब होते, मात्र शनिवारी अशा प्रकारचे वातावरण नसताना अनेक बँकेतील नेट कनेक्टिव्हिटीचा लपंडाव सुरू असल्याने बँकेच्या अधिकारी-कर्मचार्‍यांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागला.