रोहयो मजुरांच्या ‘आधार’ची बँक ‘लिंक’ पुढे सरकेना!
By Admin | Updated: April 18, 2015 01:46 IST2015-04-18T01:46:05+5:302015-04-18T01:46:05+5:30
आठ महिन्यांत राज्यात १३ लाख मजुरांचे आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्नित.

रोहयो मजुरांच्या ‘आधार’ची बँक ‘लिंक’ पुढे सरकेना!
अकोला: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणार्या मजुरांचे आधार क्रमांक बँक खाते क्रमांकाशी जोडण्याची मोहीम गेल्या ऑगस्टपासून राबविण्यात येत आहे. १७ एप्रिलपर्यंंत राज्यातील ३0 लाख ४२ हजार ९४ मजुरांपैकी १२ लाख ९३ हजार २२६ मजुरांचे आधार क्रमांक बँक खाते क्रमांकासोबत संलग्नित (लिंक) करण्यात आले. एकूण मजुरांच्या तुलनेत गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत आधार क्रमांकासोबत बँक खाते क्रमांक 'लिंक' करण्यात आलेल्या मजुरांचे प्रमाण बघता, रोहयो मजुरांच्या आधार बँक खात्याशी 'लिंक' करण्याचे काम पुढे सरकत नसल्याची बाब समोर येत आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणार्या जॉबकार्डधारक मजुरांच्या मजुरीची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा व्हावी, यासाठी रोहयो मजुरांचे आधार क्रमांक त्यांच्या बँक खाते क्रमांकासोबत संलग्नित करून, मजुरांना मजुरीची रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यासाठी रोहयो अंतर्गत जॉबकार्डधारक आणि मागील दोन वर्षांंत रोहयोचे काम केलेल्या मजुरांचे आधार क्रमांक बँक खाते क्रमांकासोबत संलग्न करण्यासाठी शासनाच्या रोहयो विभागामार्फत गत ऑगस्टपासून मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत १७ एप्रिलपर्यंंत राज्यातील १२ लाख ९३ हजार २२६ मजुरांचे आधार क्रमांक बँक खाते क्रमांकासोबत संलग्नित करण्यात आले. राज्यात एकूण ३0 लाख ४२ हजार ९२ जॉबकार्डधारक मजूर असून, त्या तुलनेत गेल्या आठ महिन्यांत १२ लाख ९३ हजार २२६ मजुरांचे आधार क्रमांक बँक खाते क्रमांकाशी 'लिंक' करण्यात आले. त्यानुषंगाने रोहयो मजुरांच्या आधार क्रमांकासोबत बँक खाते क्रमांक 'लिंक' करण्याची मोहीम पुढे सरकत नसल्याचे चित्र दिसत आहे.